महाविद्यालयीन जीवनापासून नेतृत्वाचा ठसा उमटविणारे उद्योन्मुख नेतृत्व ॲड.राहुल मखरे यांनी जनमानसात ,समाजकार्यात व राजकीय क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. आत्मविश्वास व अभ्यासपूर्ण संवाद , प्रभावी वक्तृत्व, तळागाळात दांडगा संपर्क, विविध पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांशी संपर्काचे जाळे, दुसऱ्यावर प्रभाव टाकण्याची क्षमता आणि नित्य संपर्कातून कार्यकर्ते जोडण्याची कला यातून ॲड. राहुल मखरेंनी सुसंस्कृत , निर्व्यसनी, सुशिक्षित ,सामंजस्य व सर्वांचे हित साधणारा खरा मित्र अशी प्रतिमा जनमानसात बिंबवली आहे.नेतृत्व , वक्तृत्व आणि कर्तृत्व ह्या त्रिवेणी संगमाचा मिलाप म्हणजे ॲड. राहूल (दादा)मखरे…कॉलेज जीवनापासूनच सामाजिक कार्यात सक्रिय होऊन विद्यार्थ्यांच्या फी संदर्भात कॉलेज प्रशासना विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन उभारून आपल्या संघर्षाची चुणूक दादांनी दाखवून दिली.दादांना मित्र परिवार देखील जीवाला जीव देणारा लाभला.पुढे त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले.शालेय आणि कॉलेज जीवनात आपल्या सवंगड्यां बरोबर मनमुरादपणे क्रिकेट खेळण्याचा आनंद दादांनी लुटला.इंदापूर शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कमिटीचे अध्यक्ष झाले,त्यावेळी त्यांनी बाबासाहेबांची अप्रतिम जयंती साजरी करून दाखवली. समाजातील युवा पिढी समोर एक नवा आदर्श दादांनी घालून दिला. बहुजन महापुरुषांची सामायिक जयंती उत्सव साजरा करणे ही संकल्पना देखील वकील साहेबांचीचं. किती दूरदृष्टी,कल्पकता दादांच्या व्यक्तीमत्वात / नेतृत्वात दिसून येते. त्यांनी व्यावसायिक वकिली कधी केलीच नाही. ते जनतेचे विनाशुल्क वकिली करणारे जनतेचे वकील झाले. बहुजनांवर झालेल्या कायिक, वाचिक हल्ल्याच्या विरोधात वकील साहेब खंबीरपणे जनतेच्या पाठीशी उभे राहिले.वडील रत्नाकर मखरे (तात्या) यांचे राजकारण व समाजकारणातील चांगले अनुभव व अभ्यासू वृत्तीमुळे त्यांना बाळकडू मिळाले. शिव,शाहू,फुले,आंबेडकर ह्या महापुरुषांच्या विचारांची कास धरून सामाजिक, राजकीय क्षेत्रात निष्ठेने वकील साहेब काम करू लागले.दादांनी बामसेफचे सर्वेसर्वा राष्ट्रीय नेते मा.वामन मेश्राम साहेबांचे नेतृत्व स्वीकारत आपल्या राजकीय, सामाजिक नेतृत्वाला एक नवा आयाम दिला. वकील साहेबांचे नेतृत्व खऱ्या अर्थाने खुलले. पुढे बहुजन मुक्ती पार्टी ह्या राष्ट्रीय पक्षात प्रवेश करुन नवी राजकीय इनिंग वकील साहेबांनी सुरु केली. राष्ट्रीय पक्ष नेतृत्वाने वकील साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय महासचिव पदाची जबाबदारी दिली.वकील साहेबांनी पक्षाची प्रतिष्ठा ,निष्ठा राखत स्वतःला झोकून देत निःस्वार्थपणे सर्व सामान्य व्यक्तीस अर्थात शेवटच्या घटकाला न्याय मिळण्यासाठी अनेकदा संघर्ष,आंदोलन, रास्तारोको केले.उपोषणं केली. प्रसंगी वकील साहेबांना तुरुंगवास भोगावा लागला, यामुळे सर्व सामान्य जनतेशी जोडली गेलेली नाळ अधिक घट्ट होत गेली.तरुण कार्यकर्त्यांचा विश्वास वकील साहेबांनी संपादन केला.तसेच राष्ट्रीय नेतृत्वाचा विश्वास देखील आपल्या कार्य कर्तृत्वाने त्यांनी संपादन केला. २४ ऑक्टो.२०१० रोजी भारत मुक्ती मोर्चा व संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुणे येथील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढण्यासाठी लाखोंची सभा झाली होती. त्या कार्यक्रमाचे नियोजन करण्याची जबाबदारी भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने श्रेष्ठींनी ॲड. राहुल मखरेंवर सोपवली ती अचूक, उत्तम नियोजनाने यशस्वीरित्या पार पाडून दाखवली.सर्व सामान्य कार्यकर्ता वकील साहेबांच्या हाकेला धावून येत राहिला, वकील साहेबांचे नेतृत्व अधिक उमेदीने पुढं येत राहिलं, व्यापक होत गेले.केंद्र सरकारने ओबीसी जातीनिहाय जनगणना करावी यासाठी अनेकदा रास्ता रोको, बंद , मोर्चे यासारखे लोकशाहीला धरून वकील साहेबांनी आंदोलने उभारली.युवकांचा बुलंद आवाज, युवा नेतृत्व, युवा नेते, शांत, संयमी, सुसंस्कृत, मितभाषी, प्रसंगी आक्रमक, कणखर,कल्पक, अभ्यासू नेतृत्व, कुशल संघटक, स्पष्ट वक्तेपणा, जनसेवेशी सदैव तत्पर असलेले स्पष्ट वक्ते म्हणून वकील साहेब नावारूपाला आले, ते ही स्व- कर्तृत्वाने सिध्द झाले. विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी वकील साहेबांकडे आपापली कामे घेऊन येतात .वकील साहेब कोणताही पक्षीय भेदाभेद करत नाही, कोणाचीही अडवणूक न करता शक्य होईल ती मदत नाराज न करता त्या कार्यकर्त्याला करत असतात.पुण्य परोपकार पाप ते परपीडा ! या भूमिकेतून पक्षीय भेद न बाळगता लोकांची कामं वकीलसाहेब अपेक्षेविना करत असतात.एप्रिल २०२० च्या अखेरीस कोरोना काळात भिमाई आश्रमशाळेवर आंबेडकरनगर, साठेनगर, होलारवाडा आदी भागातील गरजू लोकांना अर्थात ज्यांच्या हाताला त्यावेळी रोजगार नव्हता अशा गरजूंना गहू, तांदूळ धान्याचे वाटप मखरे परिवाराच्या वतीने केले.वकील साहेबांनी व्यक्तिशः कोरोना रुग्णांना वैद्यकीय मदत केली.कोरोना योद्धयांचा येथोचीत सन्मान केला. यातून त्यांची जनतेची सेवा करण्याची तळमळ दिसून येते.कार्यकर्त्यांशी घनिष्ट ऋणानुबंध जपणारे, कार्यकर्त्यांच्या हृदय सिंहासनावर अढळ स्थान निर्माण करणारे वकील साहेब जनतेचा आवाज बनले.समाजसेवेची परंपरा कृतीतून सिद्ध करावी लागते,हे आपल्या कृतीतून अनेकदा सिद्ध करत आज सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात यशस्वी वाटचाल वकील साहेब करत आहे. त्यांची विशेष ओळख म्हणजे राजकारणा पलीकडे पाहणारा एक सामाजिक कार्यकर्ता, जनसेवक, जनतेचा वकील अशीच राहिली आहे. जनतेचे प्रश्न, अडीअडचणी ,समस्या सोडविण्यासाठी आपला अधिकचा वेळ वकील साहेब देतात. कोरेगाव – भीमा चौकशी आयोग प्रकरणी कायदेशीर लढाई ते लढत आहे. कोरेगाव – भीमा आयोग प्रकरणात राष्ट्रीय नेते खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांची ॲड.राहुल मखरेंनी क्रॉस एक्झामिनेशन घेतली.आपल्या वकिलीतला अभ्यासू बाणा त्यांनी अनेकदा सिध्द केला आहे.शहराच्या विकासकामात कोणत्याही प्रकारचे राजकारण न आणता राजकारणा पलीकडे जाऊन सामाजिक जाणीवेतून सामाजिक प्रश्न,शहराच्या हिताचे प्रश्न सोडवणुकीसाठी अविरत परिश्रम वकील साहेब घेतात. लोकसंग्रहाचा सेतू बांधण्याची समृध्दी ऐन तारुण्यात संपादन करणाऱ्या ॲड. राहुल मखरेंना समाजकारण व राजकारणात मोठ्यांचा लाभलेला सहवास प्रगल्भता मिळवून देणारा ठरला आहे.आपल्या कार्यकर्तृत्वामुळे ॲड. राहुल मखरे हा ध्येयवेडा माणूस लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचल्याचे जाणवते.वकील साहेब हे मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे कार्याध्यक्ष व बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ह्या पदांची जबाबदारी चोखपणे पार पाडताना दिसतात.मा. अॅड. राहुल (दादा) मखरे यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष मंगलमय शुभेच्छा !! शब्दांकन नानासाहेब सानप सर,इंदापूर