जनता एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनेल अल्पावधीतच घराघरात पोहोचला – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील.

👉 जनता एक्सप्रेस मराठी न्यूजच्या दिनदर्शिकेचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते प्रकाशन.
इंदापूर: काल दूधगंगेच्या कार्यालयात जनता एक्सप्रेस मराठी न्यूजच 2023 सालच्या कॅलेंडरचे प्रकाशन माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी जनता एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलचे विशेष कौतुक केले. “जनता एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनल अवघ्या 2 वर्षात घराघरात पोहचला असून रोजच्यारोज अपडेट अशा बातम्या वेब पोर्टलद्वारे व युट्युब चॅनलद्वारे आपल्यास पहायला मिळत आहेत.त्याचबरोबर वेगवेगळ्या यशोगाथा, कृषी विषयक बातम्या, क्रीडा इत्यादी आपल्याला जनता एक्सप्रेसच्या माध्यमातून घरबसल्या पाहायला मिळत आहे.त्यामुळे सध्या असलेल्या चांगल्या चॅनलपैकी जनता एक्सप्रेस या चॅनलचे नाव घेतले जाते.” असे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले.तसेच “सध्या जनता एक्सप्रेस मराठी न्यूजचे तालुक्यातील 29000 हून अधिक सबस्क्रायबर जोडले गेले आहेत ही कौतुकास्पद बाब आहे.”असेही मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी पूर्ण दिनदर्शिका पाहून दिनदर्शिकेच्या रंगरंगोटी, सुटसुटीतपणाचे कौतुकही केले.यावेळी जनता एक्सप्रेस मराठी न्यूज चे प्रमुख संपादक श्रीयश नलवडे म्हणाले की, “जनता एक्सप्रेस मराठी न्यूज सध्या पुणे, सोलापूर, नगर,सातारा,पालघर या जिल्ह्यात कार्यरत असून या प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये प्रतिनिधी जोडण्याचे काम चालू असून पुढील वर्षात संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तार करण्याच्या हेतूने सध्या कार्य चालू आहे.चॅनल विस्ताराच्या दृष्टिकोनातूनच इंदापूरमध्ये जनता एक्सप्रेस मराठी न्यूजचे अद्यावत प्रशासकीय कार्यालयही होणार आहे.” अशी माहिती यावेळी संपादक श्रीयश नलवडे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना दिली.
या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह संपादक श्रीयश नलवडे, उपसंपादक संतोष तावरे, कार्यकारी संपादक गणेश काका घाडगे, युवा नेते स्वप्निल सावंत, पैलवान पिंटू काका काळे, दादासाहेब राऊत,भाजपा युवामोर्चाचे तेजस देवकाते,आदित्य घोलप इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here