जनता एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनल कमी दिवसातच घरा-घरात पोहचला- अंकिता पाटील ठाकरे.

जनता एक्सप्रेस मराठी न्यूज च्या दिनदर्शिकाचे अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन.
इंदापूर: जनता एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनल ने अवघ्या सहा महिन्यात घराघरात पोहचला असून रोजच्यारोज अपडेट बातम्या वेब पोर्टलद्वारे व युट्युब चॅनल द्वारे आपल्यास पहायला मिळत आहेत. सध्या जनता एक्सप्रेस मराठी न्यूज चे तालुक्यातील 12100 हून अधिक सबस्क्रायबर जोडले गेले आहेत ही कौतुकास्पद काम आहे असे मत अंकिता पाटील ठाकरे यांनी व्यक्त केले.काल जनता एक्सप्रेस च्या सन 2022 या दिनदर्शिका चे प्रकाशन जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी पूर्ण दिनदर्शिका पाहून दिनदर्शिकेच्या रंगरंगोटी, सुटसुटीतपणाचे कौतुकही केले.यावेळी जनता एक्सप्रेस मराठी न्यूज चे प्रमुख संपादक श्रीयश नलवडे म्हणाले की, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज सध्या पुणे, सोलापूर, नगर आणि सातारा या जिल्ह्यात कार्यरत असून या प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये प्रतिनिधी जोडण्याची काम चालू असून पुढील वर्षात संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तार करण्याच्या हेतूने सध्या कार्य चालू आहे. महाराष्ट्र विस्ताराच्या दृष्टिकोनातूनच इंदापुरमध्ये जनता एक्सप्रेस मराठी न्यूज चे अद्यावत प्रशासकीय ऑफिसही होणार असल्याची माहिती यावेळी संपादक श्रीयश नलवडे यांनी अंकिता पाटील ठाकरे यांना दिली.अंकिता पाटील ठाकरे यांनी पुढील कार्यासाठी जनता एक्सप्रेस मराठी न्यूज च्या सर्व टीमला शुभेच्छाही दिल्या.या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यासाठी संपादक श्रीयश नलवडे,उपसंपादक अवधूत पाटील व अतुल भालेराव,संतोष तावरे,बाळासाहेब मखरे इत्यादी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here