जनता एक्सप्रेस न्यूज चे बारामती प्रतिनिधी संदीप आढाव यांची भेट मनाला उभारी देणारी- मराठी पत्रकार परिषद मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या भावना.

इंदापूर:काल भिगवण या ठिकाणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख हे येणार आहेत हेच समजतात इंदापूर व भिगवन मधील काही तरुण पत्रकारांनी या पत्रकारिते मधील चाणक्य व्यक्तीमत्व असणाऱ्या एस एम देशमुख यांना भिगवण मध्ये रात्री भेटण्याचे ठरवले.
भिगवण मध्ये भेटल्यानंतर एस एम देशमुख यांनी आलेला अनुभव सांगितला आणि अंगावर शहारे आले पण आपण योग्य व्यक्तीला भेटलो असल्याचा मनामध्ये कुठेतरी आनंदही झाला.त्यांनी सांगितलेला अनुभव जसाच्या तसा मांडण्याचा छोटासा प्रयत्न.

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख  म्हणाले की,“काल बारामती होतो.. नेहमी प्रमाणे अनेक पत्रकारांनी माझ्या भोवती गराडा घातलेला होता.. काही गप्पा मारत होते, काही फोटो घेत होते तर काही जण सेल्फी..तेवढ्यात एक तरूण पत्रकार मित्र समोर आले.. .. आपलेपणानं म्हणाले, “सर, आपण माझ्या घरी यावं अशी माझी विनंती आहे.. इथं जवळच माझं घर आहे” मला शक्य नव्हतं.. पुढं वालचंदनगरला जायचं होतं.. तिथं कार्यक्रम होता… तिकडे पत्रकार मित्र प्रतिक्षा करीत होते.. त्यांचे सारखे फोन ही येत होते.. “पुढच्या वेळेस नक्की येईल” असं आश्वासन मी संदीपला देत असतानाच आमचे बारामती तालुका अध्यक्ष हेमंत गडकरी पुढं आले.. ते म्हणाले” सर हे संदीप आढाव.. त्यांच्या डोक्यात ताप गेला आणि ते गंभीर आजारी पडले तेव्हा आपण त्यांना आर्थिक मदत केली होती..” मग मला तो सारा घटनाक्रम आठवला.. हेमंतनं मला फोन करून संदीप आढाव गंभीर आजारी आहेत, त्यांना मराठी पत्रकार परिषदेनं मदत केली पाहिजे अशी विनंती केली होती .. मी लगेच मंगेश चिवटे यांना फोन केला.. त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून मदत करण्याचे मान्य केले.. नंतर दोन दिवसातच एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मंगेश आणि मी बारामतीला गेलो होतो.. ..कार्यक्रमातच मदतीचा चेक हेमंत गडकरी यांच्याकडं सुपूर्द केला होता.. .. तो संदीप आढाव यांना दिला गेला.. मदत फार मोठी नव्हती पण संदीप आढाव सांगतात, “ही मदत माझं मनोबल वाढविणारी आणि आपण एकटे नाही आहोत, कोणी तरी हक्काचं आपल्या सोबत आहे हा नवा विश्वास देणारी होती.. त्यामुळे मोठ्या आजारातून मी बाहेर आलो ” संदीपनं व्यक्त केलेली कृतज्ञतेची ही भावना सुकून देणारी, माझ्या अंगावर रोमांच उभे करणारी होती..

खरं तर हे सारं मी विसरून गेलो होतो.. पण संदीपला धन्यवाद यासाठी देईल की, अडचणीच्या काळात झालेल्या मदतीची आठवण त्यांनी ठेवली होती .. हल्ली असं होत नाही.. लोक लगेच विसरतात..अनेकदा कृतघ्न देखील होतात.. यासंदर्भातले अनेक वाईट अनुभव पाठिशी आहेत.. त्यामुळं मदत करायची आणि विसरून जायचं हे धोरण आम्ही ठेवलं आहे.. पण संदीपनं सुखद धक्का दिला होता..”
अशाप्रकारे हा सर्व अनुभव ऐकल्यानंतर आपण योग्य व्यक्तीला भेटल्याचा आनंद व पत्रकारितेमध्ये एकसंघ राहण्यासाठी योग्य पर्यायी छत याच व्यक्तीपासून मिळणार असल्याचा मनामध्ये विश्वास निर्माण झाला.



 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here