इंदापूर: स्वराज्याचे धाकले धनी श्री. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज अवसरीमध्ये शिवपुत्र शंभूराजे युवा प्रतिष्ठान अवसरी यांच्यामार्फत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते .आणि त्या रक्तदान शिबिरास रक्तदान हे जीवनदान, सर्वश्रेष्ठ दान हे ओळखून अवसरी व अवसरी पंचक्रोशीतील सर्व लोकांनी भरभरून प्रतिसाद देत 101 लोकांनी रक्तदान केले. प्रथम सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस हार आणि श्रीफळ फोडून या शिबिराची सुरुवात करण्यात आली. यावेळी अवसरी व पंचक्रोशीतील बहुसंख्य लोक उपस्थित होते. जवळपास 50 ते 60 रक्तदात्यांना रक्तदान नाही करता आले, कारण कोणाला रक्ताचे प्रमाण कमी तर कोण आजारी अशी इत्यादी कारणांचा अडथळा निर्माण झाला. कोणतीही अडचणी विना सर्वांना रक्तदान करता आले असते तर हाच 101 चा रक्तदात्यांचा आकडा दीडशे ते 200 च्या पुढेही गेला असता. परंतु अवसरी सारख्या एक ग्रामीण भागात ही या शिबिरासाठी मोठा भरभरून प्रतिसाद मिळाला. मुक्ताई ब्लड सेंटर इंदापूर यांच्यातर्फे प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट पाण्याचा जार आणि टिफिन डबा देण्यात आला. विशेष करून शिवपुत्र शंभूराजे युवा प्रतिष्ठान अवसरी यांचे सर्व स्तरातून विशेष कौतुक केले जात आहे. मुक्ताई ब्लड सेंटर इंदापूर यांनीही शिवपुत्र शंभूराजे युवा प्रतिष्ठान अवसरी यांना रक्तदानासारखे महान कार्य केल्याबद्दल ट्रॉफी आणि आभार पत्र दिले. यानंतर शिवपुत्र शंभुराजे युवा प्रतिष्ठान अवसरी यांच्यातर्फे दि. 13 मे 2023 रोजी तुळापूर ते अवसरी पायी ज्योत आणली जाणार आहे .तसेच दि. 14 मे 2023 रोजी श्री. छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती असून त्या जयंतीनिमित्त 15 मे 2023 रोजी व्याख्यान व भव्य अशी मिरवणूक काढली जाणार आहे. त्यामुळे अवसरी व पंचक्रोशीतील सर्व शिवप्रेमींनी ज्योत आणण्यासाठी व मिरवणुकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जनता एक्सप्रेस मराठी न्युज मार्फत शिवपुत्र शंभूराजे युवा प्रतिष्ठान अवसरी यांनी केले आहे.
Home Uncategorized छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अवसरीमध्ये घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.