गरीब मराठ्यांना ओबीसींप्रमाणेच सवलती द्या अशी मागणी करत छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. संभाजी राजेंनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे.छत्रपती संभाजी राजेंच्या उपोषणाला भाजपने पाठिंबा दिला आहे.
अद्यापही मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारने मार्गी लावलेला नाही. अनेकदा सरकारसह चर्चा करुनही मार्ग निघत नसल्याने खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी 26 फेब्रुवारी रोजी मुंबईत आमरण उपोषण करण्याची घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे. मराठा आरक्षण संदर्भात पाच वर्षात देवेंद्र फडणवसीय यांनी जी कामे केली होती ती या राज्य सरकारने केली असती तर आज खरच मराठा आरक्षण मिळालं असतं,संभाजी राजे उपोषणाला बसत आहेत आम्ही राजें सोबत आहे व त्यांना भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा आहे अशी प्रतिक्रिया खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड.आकाश फुंडकर यांनी दिली आहे.