इंदापुर: छत्रपती शिवाजी महाराजांची 392 वी जयंती इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान वाणिज्य महाविद्यालयात अर्थात आय कॉलेजमध्ये साजरी करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढायांचा, गनिमी कावा यांचा तसेच प्रत्येक कृतीचा व्यवस्थापन शास्त्राच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे इतर शिक्षणाबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पैलूचे दर्शन विद्यार्थ्यांना व्हावे, शिक्षण मिळावे या हेतूने याची अभ्यासक्रमात जोड मिळाली पाहिजे असे प्रतिपादन हर्षवर्धन पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या केवळ कृतीचे अवलोकन न करता त्यांच्या विचारांनी पुढे गेले पाहिजे असे ते म्हणाले.
यावेळी प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी दरवर्षी कॉलेजचे विद्यार्थी वेगवेगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडांवर जात असतात परंतु कोवीडमुळे गडांवर जाता आले नाही. इथून पुढच्या काळामध्ये गडावर मोहिमा आखल्या जातील व छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जिथे घडला तिथे विद्यार्थ्यांना नेण्याचा मानस असल्याचे सांगितले.याप्रसंगी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते यावेळी प्रा. डॉ. दिगंबर बिरादार, प्रा. धनंजय भोसले, प्रा विद्या गायकवाड , ना रा हायस्कूलचे प्राचार्य विकास फलफले, व्यवहारे, मोरे,नवनाथ गाडे, पवार उपस्थित होते.