इंदापूर:युवाशक्ती सामाजिक संघटना ठाणे प्रणित ‘छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य’ या संघटनेच्या पुणे जिल्हा संपर्कप्रमुखपदी शिवसेनेचे तरुण तडफदार इंदापूर उपशहर प्रमुख बालाजी पाटील यांची निवड झालेली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचे कार्य करणारे बालाजी पाटील यांनी अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग घेऊन व अनेक समाजपयोगी कामे करून गोरगरिबांना दिलासा देण्याचे काही कार्य केलेले आहे. कोरोना महाभयंकर कालखंडामध्ये शासकीय रुग्णालतील व समाजातील गोरगरीब लोकांना कोणत्या ना कोणत्या कारणाने सहारा देण्याचे काम बालाजी पाटील यांनी केले आहे आणि याच कामाची दखल नुकतेच त्यांना या निवडीचे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य ही संस्था मागील अनेक वर्षापासून गड-किल्ले साफसफाई मोहीम करत असून आत्तापर्यंत सुमारे 18 गड-किल्ले साफसफाई केले आहेत.अनेक सामाजिक कामे,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गरजूंना जीवनावश्यक वस्तूचे वाटप तसेच कोरोना काळात महाराष्ट्रात 15 ठिकाणी 14 महिने जीवनावश्यक किट व तीन हजार अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले आहे .तसेच दुसऱ्या कोरोना काळातही पाच हजार पेक्षा जास्त अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले आहे. सदय परिस्थितीत सुद्धा किट वाटप चालू आहे. शिवविचार जनमाणसात पोचण्यावचा विडा या संस्थेने घेतलेला आहे असे मत या संस्थेचे अध्यक्ष प्राणजित भाऊ गवंडी यांनी व्यक्त केले.