छञपती वाहतूक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रामभाऊ सतनामी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

नवी मुंबई (प्रतिनिधी सचिन शिंदे) : नवी मुंबईतील एमजीएम
रूग्णालयात छञपती वाहतूक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रामभाऊ सतनामी यांचे आज दुपारी ०२ वाजुन ३० मिनीटांनी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.वाहतूक सेना ह्या वाहतुक मधील येणार्या समस्या चे निवारण करत असतात.त्यातील एक अग्रेसर संघटना म्हणजे छत्रपती वाहतूक सेना ही आहे.छञपती वाहतूक सेना ही ड्रायव्हर च्या हिता साठी काम करते. त्यांच्या अडचणी साठी सतत धडपड असते. भारतात,महाराष्ट्रात छञपती वाहतूक सेनेचे चे कार्य खुप मोठे आहे. छञपती वाहतूक सेना ही ड्रायव्हर च्या समस्या सोडविण्यात अग्रेसर आहे.या सेनेचे शिलेदार रामभाऊ सतनामी यांचे योगदान खुप मोठे आहे.
आज सकाळी त्यांना हदयचा ञास जाणवत असल्याने नवी मुंबई मधील एमजीएम रूग्णालयात दाखल केले, पण दुपारी ०२.३० ला त्यांचे निधन झाले.या निधनाने संपुर्ण महाराष्ट्रात ड्रायव्हर बंधु मध्ये शोककळा पसरली आहे.महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातुन रामभाऊ सतनामी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली आहे.त्यांच्या पश्चात त्यांचे आई वडील, एक मुलगा आणी एक मुलगी आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here