सध्या आरक्षण आणि राजकीय घडामोडी याच्या चर्चा आता महाराष्ट्रभर रंगू लागले आहेत त्यातच आज सकाळी बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ॲड.राहुल मखरे यांनी एक खळबळजनक व बेधडक पोस्ट टाकली आहे या पोस्टमध्ये अनेक गौप्यस्फोट त्यांनी केले आहेत यामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या घरावर हल्ले होणार होते असा मोठे वक्तव्य या पोस्टमध्ये पाहायला मिळते. त्याचप्रमाणे इतरही अनेक बाबींचा या पोस्टमध्ये समावेश आहे. आपल्या फेसबुक पेजवर राहुल मखरे यांनी जी पोस्ट केली आहे ती खालील प्रमाणे….
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( शरदचंद्रजी पवार गट ) , RSS , भाजपा , ईडी , निवडणूक आयोग.लोकशाहीचे खूनी , गेंड्याच्या कातडीचे , पक्षचोरांचे साथीदार , बाप चोरांचे साथीदार , मत चोरांचे सरदार…निवडणूक आयोगाला लोक कित्ती कित्ती विशेषणे देत आहेत…पण RSS व भाजपने पाळलेला आयोग त्यावर काहीच प्रतिक्रिया देत नाही…काही कुत्री स्थितप्रज्ञ असतात…डोळ्यावरील आलेला कानही बाजूला करून बघत नाहीत तसे…निवडणूक आयोगाची जागा ही केंद्रीय निवडणूक आयोगाचे कार्यालय नाही तर आजन्म जेल आहे…असे काही लोक बोलत आहेत. काही लोक म्हणत आहेत की त्यांना खस्सी करून टोल नाक्यावर, सिग्नलला साडी घालून आजन्म टाळ्या वाजवण्याची शिक्षा दिली पाहीजे…पण ते म्हणजे निर्लज्जम् सदा सुखी…पण खरा दोष निवडणूक आयोगाचा नाही. एका विशिष्ट वर्गाच्या समुदायाच्या विचारधारेचे लोक तेथे कायदा करून बसवले गेले आहेत.असे कायदे करण्यासाठी भाजपने एकशे चाळीस खासदारांना निलंबित केले. यातून या देशद्रोही निवडणूक आयोगाला एक मेसेज गेला, आपला मालक खंबीर आहे…. आपले कोणी काहीच वाकडे करू शकत नाही.EVM वरील शंकाच्या संदर्भात ६७ % मतदारांचे समर्थन असलेल्या २८ विरोधी पक्षांच्या वतीने जयराम रमेश यांनी चर्चेसाठी काही मिनिटे लिखित स्वरूपात वेळ मागितली होती. पण त्यांनी जयराम रमेश यांच्या पत्राला लिखित स्वरूपात उत्तर देऊन सांगितले की आम्ही वेळ देणार नाही. वैचारिक प्रतिवाद ते करू शकत नाहीत हे त्यांनी मौन धारण करून मान्य केले आहे.शाळा , शिक्षण , शिक्षक हे संपवण्यासाठी शिक्षक विरहित डिजिटल शाळांचा निर्णय झाला आहे. नौकरी , रोजगार , शेती , छोटे व मध्यम व्यवसाय संपण्याच्या मार्गावर आहेत.RSS व भाजपच्या धोरणांना भारतात सर्वात मोठा राजकीय अडथळा म्हणजे मा.शरद पवार आहेत. त्यांच्या मृत्यूची वाट पहात गिधाडे टपून बसली आहेत.सोशल मीडियावर RSS प्रणीत अनेक जनावरे फेक अकाऊंटवरून याबाबत लिहीत आहेत व अशा लोकांच्यावर काही ठिकाणी गुन्हेही दाखल झाले आहेत. परिस्थिती अत्यंत भयंकर आहे. मला फक्त या संदर्भात काही उदाहरणे द्यायची आहेत...मा. छगन भुजबळ यांची काही दिवसांपूर्वी इंदापूरला सभा झाली. सभे नंतर फडणवीस यांनी ठेवलेले गोपी पडळकर हे बावनकुळेच्या आदेशाने तिथेच शेजारी त्यांच्या कार्यकर्त्याला भेट द्यायला गेले. तिथे त्यांच्यावर एका RSS च्या कार्यकर्त्याने चप्पल फेकली… ज्याने चप्पल फेकली त्या फिक्कट निळा शर्ट घातलेल्या मुलाचा व्हिडीओ उपलब्ध आहे. तो कोण होता…कुठून आला…नंतर कोठे गायब झाला याची काहीच माहिती नाही. जिथे हा गोंधळ झाला तेथील मराठा कार्यकर्त्यांनाही याची माहिती नाही.त्यानंतर धनगर लोकांना भडकावून एका मोर्चाचे आयोजन करण्यात आले.या मोर्चा संदर्भात काही पोस्ट माळशिरस भागात सोशल मीडियावर फिरत होत्या. त्यासंदर्भात मी तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक यांना बोललो व पुढील अनुचित प्रकार टळला.या प्रकरणात एवढे गंभीर काहीच नाही असा वाचकांचा समज होईल. पण या मोर्चाच्या आयोजकांच्याकडे माहिती घेतली तर फार मोठा हिंसाचार घडवून आणण्यासाठी व महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी मध्ये दंगली घडवून आणण्याचा RSS चा कट होता हे स्पष्ट दिसत आहे.या मोर्चानंतर लगेचच इंदापुरात पहीला हल्ला अरविंद तात्या वाघ यांचा पेट्रोल पंप फोडून होणार होता.तो धनगर लोकांनी केला आहे असे भासवून काही वेळाच्या अंतराने दत्तात्रय भरणे यांचे बंधू , मधूमामा भरणे यांचे घरावर हल्ला करण्यात येणार होता. त्यानंतर हर्षवर्धन उर्फ भाऊ पाटील , दशरथ दादा माने यांच्या घरावर हल्ला करण्यात येणार होता.RSS ने १ जानेवारी २०१८ नंतर पुन्हा महाराष्ट्र पेटवला असता व २०२४ च्या निवडणुका त्यावर जिंकल्या असत्या.२०१९ च्या निवडणुकी अगोदर पुलवामा हल्ला घडविण्यात आला… जम्मू काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल यांनी या बाबतीत माहिती दिली आहे.करकरे , दाभोळकर , पानसरे , जस्टीस लोया यांच्या हत्येचे मारेकरी अजून मोकाट आहेत( RSS किती खालच्या पातळीवर जाऊन षडयंत्र आखते याची ही उदाहरणे आहेत. ) त्यांच्या साठी त्यांच्या विचारधारेच्या विरोधात जाणारे ब्राह्मण किंवा भारतीय नागरिक म्हणजे क: पदार्थ आहेत.यांना इथे जगू दिले जाणार नाही.जगले तरी सरकारी संस्था व वेळप्रसंगी न्यायालयाचा दुरुपयोग करून सतावले जाईल…त्यांचा , त्यांच्या कुटुंबीयांचा मानसिक छळ केला जाईल.या विशिष्ट वर्गाच्या विशिष्ट विचारसरणीच्या विरोधात मा.शरद पवार साहेबांनी आघाडी बनवण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न केला होता व त्याला मोठे यश आले होते.याचा राग मनात धरून सूडबुद्धीने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन RSS प्रणीत भाजप सरकारला , त्यांनी पाळलेलेल्या ईडीचा , निवडणूक आयोगाचा वापर करून पवारांनी शरणागती पत्करली पाहीजे अशी परिस्थिती निर्माण करायची होती.ही शरणागती पत्करण्यास मा. शरद पवार तयार नव्हते व त्याचा परिणाम म्हणजे कुटुंबातील सदस्यावर ईडीची चौकशी लागली. ज्यांनी पक्ष स्थापन केला , वाढवला त्यांच्या पक्षाच्या नरडीचा घोट घेतला गेला.मा. शरद पवार साहेबांनी त्यांच्या पक्षातील महिला कार्यकर्त्यांना लोकांच्या प्रश्नावर रस्त्यावर येऊन संघर्ष करण्याचे आवाहन होते. ( या आवाहनाला प्रतिसाद मिळायला पाहीजे होता.)राष्ट्रपिता महात्मा फुलेंच्या वर आधारित “सत्यशोधक” चित्रपटात या विशिष्ट वर्गाला उद्देशून एक डायलॉग आहे. विशिष्ट वर्गाने हिंसेचा आधार घेण्याच्या पार्श्वभूमीवर तो डायलॉग आहे.मी तुमच्या बरोबर वैचारिक लढाई करण्यासाठी तयार आहे…आणि तुम्हाला रस्त्यावरील लढाई परवडणारी नाही.या वर्तमान व इतिहासाचा मतितार्थ आहे की ते लोक वैचारिक लढाई लढण्यासाठी तयार नाहीत…बहुजन समाजाने संविधानिक मार्गाने रस्त्यावरील लढाई साठी तयार झाले पाहीजे…ही शेवटची लढाई आहे…शेवटचा पर्याय आहे.या देशात हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेले गणतंत्र , लोकशाही मूल्य , वाचवण्यासाठी मा. शरद पवार यांच्यासहीत जे जे लोक यासाठी पुढाकार घेतील त्यांच्या बरोबर आम्ही आहोत.Adv.Rahul makhare सदरच्या पोस्टची लिंक https://www.facebook.com/share/p/wdJQx6rHBvozfAMy/?mibextid=2JQ9oc
वरील प्रमाणे बेधडक व खळबळजनक पोस्ट केल्यानंतर इंदापूरसह महाराष्ट्रातील लोकांना याबाबतीत खरं काय ते जाणून घेण्याची इच्छा लागून राहिली आहे म्हणूनच ॲड.राहुल मखरे यांनी लवकरात लवकर पत्रकार परिषद घेऊन याबाबतीत अधिकचे स्पष्टीकरण द्यावे अशीच लोकांची इच्छा असेल एवढं मात्र नक्की..
Home Uncategorized छगन भुजबळ यांच्या इंदापुरातील सभेनंतर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार दत्तात्रय...