भिगवण प्रतिनिधी (निलेश गायकवाड )
(भिगवण ): मदनवाडी येथे समृद्धी क्रीडा प्रतिष्ठान च्या वतीने आयोजन करण्यात आलेल्या जंगी निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानात नेत्रदीपक कुस्त्यांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
मैदानात चित्तथरारक लढतीत महाराष्ट्राचा तुफानी मल्ल पै.बाला रफिक शेख विरुद्ध युपी केसरी बंटी कुमार हरियाणा या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.यामध्ये पै. बाला रफिक शेख ने मुसंडी मारत हरियाणा च्या मल्लाला चितपट केले. दुसरी कुस्ती इंदापूर चा भारत मदने विरुद्ध कोल्हापूर चा पै.सिकंदर शेख यांच्या लढतीत सिकंदर विजयी झाला व चांदीच्या गदेचा मानकरी झाला .यासह मैदानात अनेक चित्तथरारक कुस्त्या पार पडल्या.यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, दौंड चे आमदार राहुल कुल, मोहळ चे आमदार यशवंत माने, उपमहाराष्ट्र केसरी बबन काशीद, अतुल पाटील, उमेश सूळ, शंकर भोरडे, श्याम मारणे, विजय खळदकर, व ज्यांनी चांदीची गदा दिली ते नवीन भालेकर, अनुप मोरे, श्रीकांत रावळकर प्रमुख पाहुणे उपस्थित होते. तसेच मारुती वनवे, पराग जाधव, संजय देहाडे,संपत बंडगर,आबासो देवकते, नानासो बंडगर,तुकाराम बंडगर, विष्णूपंत देवकाते, सतीश शिंगाडे,पांडुरंग जगताप, तुषार चव्हाण,हर्षवर्धन ढवळे आदिजन उपस्थितीत होते.मैदानाचे नीटनेटके आयोजन समृद्धी क्रीडा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष कुंडलिक बंडगर, कार्याध्यक्ष तेजस देवकाते यांनी केले होते.व नियोजन योगेश बंडगर,प्रकाश शिंगाडे, प्रदीप बंडगर,नानासो बंडगर, पप्पू ढवळे, बंडा बंडगर, विराज बंडगर आदिजन
मैदानाचे धावते सूत्रसंचालन कुस्तीक्षेत्रातील बुलंद आवाज,अभ्यासू शंकर पुजारी सर,प्रशांत भागवत व महादेव बंडगर यांनी केले.
मैदानाची थेट प्रेक्षपण व प्रसिद्धी युट्युब चॅनेलद्वारे Live प्रक्षेपण करण्यात आले.