इंदापुर प्रतिनिधी – चिकनगुनिया व डेंगु च्या नियंत्रणासाठी त्वरीत औषध फवारणी करावी , इंदापुर शहर कॉग्रेस कमिटी चे मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी , कोरोना सारख्या महामारी मधुन शहर बाहेर पडत असताना डेग्यु व चिकणगुणिया सारख्या रोगराईने थैमान घातल्याचे चित्र शहरामध्ये दिसुन येत आहे .
शहरामध्ये अनेक डेंगू व चिकनगुनिया चे रूग्ण आढळून आले आहेत , तरी शहरामधील प्रभागनिहाय नगरपालिकेने औषध फवारणी त्वरित चालु करावी अशा आशयाचे पत्र इंदापुर शहर कॉग्रेस कमिटी चे शहराध्यक्ष चमनभाई बागवान यांच्या पत्राद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी केले आहे .
या वेळी शहर अध्यक्ष चमनभाई बागवान, डॉ.संतोष होगले,जाकीरभाई काझी, , महादेव लोंढे, ,आकाश पवार, युवराज गायकवाड, नवनाथ गायकवाड उपस्थित होते.