भारतात अमरनाथ यात्रेसाठी लाखो भाविक देशाच्या कानाकोपऱ्यातून येत असतात. यावर्षी पुण्याच्या आळंदीतून अमरनाथ यात्रेला गेलेले 14 भाविक संपर्काबाहेर आहेत, अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. या अमरनाथ यात्रेसाठी पुण्यातून दरवर्षी भाविक जातात.यावर्षी एकून 50 भाविक यात्रेसाठी गेले होते. अपघातानंतर पुण्यातील भाविकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता 50 पैकी 36 भाविकांशीच संपर्क होऊ शकला आहे. मात्र 14 नागरिकांशी अजूनही काहीच संपर्क होऊ शकला नसल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालय उत्तराखंड प्रशासनाकडून अधिकची माहिती घेत आहेत. अमरनाथ यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून अनेक भाविक अमरनाथ यात्रेला जात असतात. मोठ्या भक्तीने ते यात्रा करतात. मात्र यावर्षी मोठी दुर्घटना घडल्याने अनेक भाविकांना आपला जीव गमवावा लागला आहे.अमरनाथ गुहेच्या सखल भागात शुक्रवारी सांयकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ढगफुटी झाल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि इतर यंत्रणांकडून बचावकार्य सुरू आहे.
Home ताज्या-घडामोडी चिंताजनक..! अमरनाथ यात्रेला गेलेल्या पुण्यातील 50 भविकांपैकी 14 भाविक संपर्काबाहेर.