शिरूर : (प्रतिनिधी. सचिन शिंदे) शिरूर तालुक्यातील चिंचोली मोराची गावात ञिदल आजी -माजी सैनिक संघटना शाखेचे भव्य उद्घाटन व निवृत्त सैनिकांचा सेवापुर्ती सन्मान सोहळा मोठया उत्साहात पार पाडला.संघटना संस्थापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.संदिपभाऊ लगड यांच्या अध्यक्षतेखाली शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करत सुरुवात करण्यात आली.प्रास्ताविक मार्गदर्शन ञिदल संघटना चे संपर्कप्रमुख व पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. शामराव धुमाळ यांनी केले.चिंचोली गाव संघटना अध्यक्ष श्री.राजेश नाणेकर यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
ञिदल आजी- माजी सैनिक संघटना शाखेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य त्रिदल सैनिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री संदीपभाऊ लगड साहेब आणि प्रवक्ता एस के आठरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. या संघटनेच्या माध्यमातून सैनिकांच्या ज्या विविध प्रकारच्या अडीअडचणी आहेत त्यांचे निराकरण कशा प्रकारे केले याची माहिती देऊन अद्याप प्रलंबित असणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी संघटना प्रयत्नशील असल्याचे सांगितले.आजी माजी सैनिक परिवारने एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमात अतिमहत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. तसेच सदर कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य महिला आघाडी अध्यक्ष सौ भारती ताई लगड, तालुका अध्यक्ष सौ उज्वला ताई इचके,त्रिदल सैनिक सेवा संघटनेचे कायदेशीर सल्लागार ऍड सौ रेश्मा ताई चौधरी, पुणे जिला सचिव श्री बाळासाहेब नवले,जिल्हा संपर्क प्रमुख विठ्ठल जगताप,जिल्हा सहसचिव सुनील चौहान, शिरूर तालुका अध्यक्ष श्री बबन पवार,उपाध्यक्ष श्री विठ्ठल जाधव, संपर्क प्रमुख चंद्रकांत लांडगे,सल्लागार श्री इन्द्रभान सरोदे असे सुमारे १५० त्रिदल सैनिक संघटना पदाधिकारी व सैनिक परिवार उपस्थित होते. या कार्यक्रमात चिंचोली मोराची मधील प्रथम सैनिक स्व.विष्णु सावळाराम उकिर्डे यांच्या परिवाराचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच चिंचोली गावचे भूमिपुत्र मेजर विठ्ठल शामराव नाणेकर आणि मेजर अशोक सुखदेव गोरडे हे नुकतेच सैन्यदलातुल देश सेवा करुन आपल्या जन्मभुमीत परत आले त्यानिमित्ताने गावच्या वतीने भव्यदिव्य स्वागत, मिरवणूक काढण्यात आली.
या वेळी गावचे आजी माजी सरपच,उपसरपंच पोलिस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य,आजी माजी सोसायटी पदाधिकारी व नागरिक तसेच गाव शाखा संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष श्री राजेश नाणेकर, उपाध्यक्ष श्री सावळा धुमाळ,सचिव श्री प्रकाश नाणेकर,सहसचिव श्री संतोष नाणेकर,कार्याध्यक्ष श्री विठ्ठल नाणेकर,
सहकार्याध्यक्ष श्री अशोक गोरडे खजिनदार श्री जगन्नाथ धुमाळ,सह खजिनदार श्री भाऊसाहेब गोरडे,संपर्क प्रमुख श्री शामराव धुमाळ,सह संपर्क प्रमुख श्री मारूती थोपटे,
सल्लागार श्री विठ्ठल राव धुमाळ,सह सल्लागार श्री अशोकराव गोरडे,संचालक श्री मिनीनाथ नाणेकर संचालक श्री पोपट महाजन, संचालक श्री दादाभाऊ पोखरकर,संचालक आण्णा साहेब मिडघुले, संचालक प्रताप गोरडे,तसेच आजी सैनिक श्री मिनीनाथ धुमाळ, किसन गोरडे, व गावकरी मंडळी हे मोठ्या संख्येने तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.