अष्टविनायक पैकी एक असलेले पुणे शहराजवळील थेऊर तालुका हवेली येथील चिंतामणी मंदिरात दर चतुर्थीला ज्येष्ठ नागरिक भाविक अंध अपंग व्यक्तींना जास्त वेळ रांगेत उभे राहून दर्शन घ्यावे लागते.पै.दत्तात्रय उर्फ आबा काळें सामाजिक प्रतिष्ठाण थेऊर यांच्या वतीने चिंचवड देवस्थान ट्रस्टी श्री आनंद तांबे महाराज यांना प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा.दत्तत्रय उर्फ आबा काळें यांनी श्री क्षेत्र थेऊर चिंतामणी मंदिर येथे ज्येष्ठ नागरिक भाविक अंध अपंग व्यक्तींना चिंतामणी देवतेच्या दर्शनाला सुलभरित्या जाण्यासाठी सोय करावी असे निवेदन देण्यात आले. दर चतुर्थीला होणारी गर्दी लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिक भाविक अंध अपंग व्यक्तींना वयोमानानुसार होणारा त्रास बघता ते रांगेत उभे राहून दर्शन घेवू शकत नाही त्यामुळे आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र दाखवून त्यांना डायरेक्ट दर्शन मिळावं अशी इच्छा दत्तात्रय उर्फ आबा काळें यांनी व्यक्त केली होती.