चक्क देवालाही फसवले…! पंढरपूर विठ्ठल मंदिरातील धक्कादायक प्रकार.

पंढरपूर: विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वर्षभरात लाखो भाविक येत असतात. अनेक जण आपले नवस पूर्ण झाल्याच्या भावनेने रोख रक्कम, सोन्याचे,चांदीचे दागिने दान करत असतात. देवाची दान पेटी मोजताना यात अनेक प्रकारचे दागिने आढळतात. या दागिन्यांना सराफा कडून खरे आहेत का? हे तपासले जाते. खरे असणारे दागिने व्यवस्थीत ठेवले जातात. यात अनेक दागिने सोन्या-चांदी सारखे दिसणारे, पण त्याला पॉलिश केलेले किंवा बेंटेक्स प्रकारचे आढळले आहेत. अशा नकली दागिन्यांची संख्या एक पोते भरेल इतकी झाली आहे.भाविकांनी श्रद्धेने देवाला काय अर्पण करावे? हा त्यांच्या भावनेचा विषय आहे. पण सोने समजून दुसरी नकली वस्तू कोणी विक्री करत असेल तर भाविकांनी काळजी घ्यावी किंवा पावती घ्यावी जेणे करून फसवणूक होणार नाही, असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी केले आहे. ‘आपली श्रद्धा असते, श्रद्धेपोटी आपण काहीही दान करू शकता. पण सोन्याचे दागिने घेतले असतील तर रितसर पावती घ्यावी, ते व्यवस्थित आहेत का ते बघावं, नंतर आमच्याकडे दान करावं. श्रद्धेपोटी काहीही दान केलं तरी पांडुरंग त्याला नाही म्हणणार नाही, पण स्वत:ची फसवणूक होणार नाही, याची काळजी भाविकांनी घ्यावी,’ असं आवाहन मंदिराच्या व्यवस्थापनाने केलं आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here