चंद्रप्रभू स्कूलमध्ये ऐतिहासिक वेशभूषेत “शिवजन्मोत्सव” साजरा

नातेपुते:चंद्रप्रभू इंग्लिश मेडीयम स्कूल नातेपुते याठिकाणी “शिवजयंती” ऐतिहासिक आणि पारंपारिक वेशभूषेत मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमास इतिहास अभ्यासक व नातेपुते केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. प्रशांतजी सरुडकर सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. वर्धमानजी दोशी उपस्थीत होते. यावेळी डॉ्. उदयकुमार दोशी, मुख्यध्यापिका शितल ढोपे मॅडम, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.
शिवजयंती निमित्ताने सर्व विद्यार्थी पारंपारिक वेशभूषा परिधान करून आले होते. प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे आणि नवीन शंभर पुस्तकांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर धिरेन ननवरे, अर्पित व्होरा, श्रेया कर्चे, सृष्टी लोणारी, उजाला कर्चे या विद्यार्थ्यानी शिवरायांच्या पराक्रमावर उत्कृष्ट भाषणे केली. तर मैत्री भगत, साईज्ञा सोलंकर, ईशिता महामुनी, गौरी धालपे, वृंदावनी लाळगे, जान्हवी काळे, श्रेया करचे यांनी “पोवाडा” म्हणून पराक्रमाची गाथा गायली. यानंतर प्रि-प्रायमारी विभागातील सांची इंगळे हिने’झुलवा पाळणा बाल शिवाजीचा’ तर सिनियर केजी च्या मुलींनी “शिवबा माझा मल्हारी मल्हारी” या गाण्यावर नृत्य सादर केले.प्राथमिक विभागातील इयत्ता – सहावीच्या मुलांनी स्वराज्याची शपथ हे नाटक तर सातवीच्या मुलांनी थीम साँग वर भन्नाट नृत्य सादर करून अंगावर शहारे आणले.त्याचप्रमाणे सातवीच्या वर्गातील नील भंडारी याने तलवारबाजी आणि लाठी काठी या शिवकालीन खेळांचे प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी प्रशालेच्या विद्यार्थ्यानी रायगड किल्ल्याची भव्यदिव्य प्रतिकृती साकारली होती.
इतिहास विषय शिक्षक श्री. संजय वलेकर सर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकीय व्हिजन अन् आपल्या भविष्यासाठी शिवरायांचा इतिहास किती उपयोगी आहे हे सांगताना औरंगझेब, शाहिस्तेखान,फिलिप मॅसन यांची उदाहरणे देवून शिवरायांचा इतिहास उलगडला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्यध्यापिका शितल ढोपे मॅडम यांनी केले. यावेळी त्यांनी शिवरायांना बद्दल विस्तृत माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता गोरे टीचर आणि संजय वलेकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक खांडेकर सर यांनी केले.



🏹 धनुष्यबाण चिन्ह शिंदेना: काय वाटते मराठी माणसाला? महाराष्ट्रातील पहिला ग्राउंड रिपोर्ट थेट आठवडे बाजारातून : पुढील लिंक वर क्लिक करून पहा https://youtu.be/96UI7J_epPk https://youtu.be/96UI7J_epPk

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here