चंद्रप्रभू एज्युकेशन पॅटर्न यशस्वितेचे रोल मॉडेल – श्री. उज्वलकुमार दोशी

नातेपुते,ता – 3 जानेवारी रोजी चंद्रप्रभू इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्रसिद्ध उद्योगपती तथा सचिव,अरिहंत पब्लिक स्कूल, पंढरपूरचे श्री. उज्वलकुमार दोशी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत “चंद्रपभू एज्यूकेशन पॅटर्नची यशोगाथा” ही डॉक्युमेंटरी फिल्म प्रदर्शित करण्यात आली. यावेळी बोलताना त्यांनी चंद्रप्रभू एज्यूकेशन पॅटर्न हा गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा उत्कृष्ट रोल मॉडेल असून येथे राबवणारे उपक्रम हे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक , मानसिक आणि शारीरिक क्षमतांचा विकास करणारे आहेत. असे मत व्यक्त केले.यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. नरेंद्र गांधी यांनी आध्यक्षिय भाषण करताना चालू वर्षी नवीन राष्ट्रीय शैक्षणीक धोरण आमलात आणणारी चंद्रप्रभू स्कूल एकमेव असून विद्यार्थीयांच्या सर्वांगीण विकासासाठी अद्यावत सुविधांनी आणि सुधारित अभ्याससक्रम परिपूर्ण शाळा असल्याचे सांगत संस्थेची 20 वर्षाची उज्वल परंपरा त्यांनी विषद केली.
यावेळी नगराध्यक्ष सौ. उत्कर्षाराणी पलंगे, बांधकाम सभापती श्री. अतुलबापू पाटील, नगरसेवक श्री. अविनाश दोषी, व्ह्यईस चेअरमन डॉ. वर्धमान दोषी, सेक्रेटरी श्री. विरेंद्र दावडा, ट्रेझरर श्री. संजय गांधी, अक्षय प्रशालेचे सभापती श्री. नंदकिशोर धालपे, मार्केट कमिटीचे संचालक श्री. बाहुबली चांकेश्वरा, संस्थेचे संचालक डॉ. सागर गांधी, श्री. मनीष दोषी यावेळी वरील मान्यवर सपत्नीक उपस्थित होते.यावेळी मान्यवर पाहुण्याच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. अतिशय भव्य दिव्य कलामंचावर चंद्रप्रभू स्कूलचा हा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा पार पडला. यावेळी आकर्षक रोषणाई ने स्कूल कॅम्पस उजळून निघाला होता. सदर कार्यक्रमास हजारो पालक, नागरिक, आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्यध्यापिका सौ. शितल ढोपे यांनी केले. बक्षीस वितरण श्री. फिरोज अतार यांनी तर सूत्रसंचालन श्री. संजय वलेकर, सौ. निता सुतार आणि श्री. राजेंद्र पिसे यांनी केले.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here