“चंद्रप्रभू’जगविख्यात शिक्षण देणारी शाळा”- चेअरमन नरेंद्र गांधी

नातेपुते ता – २६ चंद्रप्रभू इंग्लिश मेडीयम स्कूल, नातेपुते येथे 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध व्यापारी आणि जेष्ठ गव्हर्निंग काऊन्सिल मेंबर श्री.पृथ्वीराज डूडू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत व ध्वजगीत गायन करून राष्ट्रीय झेंड्याला सलामी दिली.यावेळी श्री.डूडू यांची सुविद्य पत्नी मिनाक्षी डूडू सह कुटुंबिय उपस्थित होते. तसेच संस्थेचे चेअरमन श्री. नरेंद्र गांधी, सेक्रेटरी श्री. विरेंद्र दावडा गव्हर्निंग काऊन्सिल मेंबर डॉ. सागर गांधी, श्री.विरेंद्र डूडू व श्री.वैभव दोशी, सौ. अर्चना गांधी मुख्यध्यापिका सौ. शितल ढोपे मॅडम, प्राथमिक पर्यवेक्षक श्री. दादा खांडेकर ,पूर्व प्राथमिक पर्यवेक्षिका सौ. पल्लवी कुलकर्णी सह विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मुख्यध्यापिका ढोपे मॅडम यांनी शाळेचा वार्षिक आढवा देताना दहवीच्या निकलाची उज्वल परंपरा सांगताना विवध उपक्रम, कळसूबाई शिखर सहल, खेळ स्पर्धा , स्कॉलरशिप यांचा विस्तृत आढावा देताना गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी कु. श्रीशा ज्ञानराज पाटील ( तिसरी), कु. प्रणाली तात्यासाहेब वाघमोडे (चौथी) आणि पूर्वविभागातील कु.विहान दिलीप माळी , कु. श्रेयांश विजय काळे या चिमुकल्यांनी इंग्रजी मधून अत्यंत प्रभावीपणे भाषणे केली.तसेच यावेळी इयत्ता- सातवी, आठवी व नववीच्या विद्यार्थ्यानी शिस्तबध्द पध्दतीने संचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली.यानंतर विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षिय भाषण करताना संस्थेचे चेअरमन श्री. नरेंद्र गांधी यांनी “चंद्रप्रभू’जगविख्यात शिक्षण देणारी शाळा आहे.असे मत व्यक्त केले. पुढे बोलताना श्री. गांधी यांनी शाळेत राबवणाऱ्या विविध उप्रकम, स्पर्धा, गुणवत्ता आणि अभ्यासक्रम याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाचे स्वागत केले . आम्ही नवीन शैक्षणिक धोरण हे याच वर्षापासून नर्सरी ते पहिलीच्या वर्गाना राबवल्याचे ही त्यांनी आभिमनाने सांगितले.सदर कार्यक्रमाचे पथसंचलन श्री. विकास सुळ, बक्षीस वितरण सौ. योगिता गोरे आणि संविधान शपथ सौ. निता सुतार यांनी तर सूत्रसंचालन सौ. निलोफर मुजावर यांनी केले.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here