घराकडे जाणारा रस्ता खुला व्हावा या मागणीसाठी मृतदेह ग्रामपंचायत समोर ठेवण्याचा प्रकार..

वडगाव निंबाळकर : घराकडे जाणारा रस्ता खुला व्हावा या मागणीसाठी मृतदेह ग्रामपंचायत समोर ठेवण्याचा प्रकार थोपटेवाडी ता. बारामती येथे सोमवार ता. 21 रोजी घडला पोलीस आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यामुळे तणाव निवळला.येथील निलेश बिंटू कर्वे वय 25 यांचे आजारपणामुळे सोमवारी पहाटे खासगी रुग्णालयात निधन झाले. कर्वे कुटुंब येथिल बनाजीनगर परिसरात राहते त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता कंपाउड टाकुन आडवला आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासन पंचायत समिती आणि तहसीलदारांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता याबाबत योग्य ती कारवाई झाली नसल्यामुळे कर्वे कुटुंबाला आपल्यावर अन्याय झाला अशी भावना झाली होती. याच भावनेतुन आजारपणामुळे निधन झाले असे कर्वे कुटुंबियांचे मत आहे यामुळे त्यांनी तरुणाचा मृतदेह रुग्णवाहिकेतून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणला आणि रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा असा सवाल उपलब्ध केला सुमारे तीन तास मृतदेह जागेवर होता.
सरपंच रेखा बनकर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दत्तात्रेय खंडाळे वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे पंचायत समितीचे गटनेते प्रदीप धापटे यांनी घटनास्थळी जाऊन संतप्त नातेवाईकांशी संवाद साधला. अखेर ग्रामपंचायतीने पोलिस बंदोबस्त मागण्याचा पत्र दिले यामुळे तणाव निवळला आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी युवकाला मदत केली होती. २४ फेब्रुवारीला रस्ता काढून देण्यासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे.
राजकिय द्वेषातून गावातील विरोधकांनी युवकाच्या मृत्यूचे राजकारण करणे दुदैवी आहे. हा रस्ता खुला करण्यासाठी ग्रामपंचायतीनेच सहा महिन्यांपूर्वी तहसीलदारांना पत्र दिले होते. कर्वे कुटुंबाला जवळचा दुसरा रस्ता उपलब्ध करून देत त्यावर २ लाख २० हजारांचा निधी टाकला आहे अशी प्रतिक्रिया सरपंच रेखा बनकर व उपसरपंच कल्याण गावडे यांनी दिली.
“अतिक्रमण करून रस्ता अडविण्यातून हा प्रकार घडला. कर्वे यांनी केलेल्या मागणीवर तहसीलदारांनी रस्ता काढून देण्यासाठी वडगाव पोलिस ठाण्याला बंदोबस्त देण्याचे आदेश दिले होते. पोलिस ठाण्याने ग्रामपंचायतीला पत्र देत कधी व कसा बंदोबस्त लागणार यासंबंधी विचारणा केली होती. परंतु ग्रामपंचायतीकडून कोणतेही उत्तर आले नाही. वास्तविक वादग्रस्त विषय गायरान जागेतील आहे.” सोमनाथ लांडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक वडगाव निंबाळकर

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here