ग्राहक कल्याण फाउंडेशन ची इंदापूर तालुका कार्यकारणी जाहीर. तालुका अध्यक्ष पदी हनुमंतराव कदम यांची निवड.

इंदापूर : ३० (प्रतिनिधी) ग्राहक कल्याण फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शना खाली, इंदापूर तालुका कार्यकर्ता मेळावा, शुक्रवार दि. २८/१०/२०२२ रोजी सावता महाराज मंदिर हाॅल, इंदापूर, या ठिकाणी ग्राहक कल्याण फाउंडेशन जिल्हाध्यक्ष श्री नरहरी गांजवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ग्राहक कल्याण फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.तुकाराम महाराज निंबाळकर, समन्वय समिती अध्यक्ष श्री सतिश साकोरे, राज्य कार्यकारिणी सदस्य सचिव श्री अस्लम तांबोळी ,जिल्हा उपाध्यक्ष श्री मारुती पठारे , जिल्हा सचिव श्री सतिश थिटे, जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री पोपटराव साठे उपस्थित होते. तसेच इंदापूर तालुक्यातील अनेक कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमात इंदापूर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
श्री हनुमंत वसंत कदम यांची इंदापूर तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तसेच संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.तुकाराम महाराज निंबाळकर यांचे हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांचा व सर्व कार्यकारिणीचा सन्मान करण्यात आला. सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन ग्राहक कल्याण फाउंडेशन चे कार्य गावोगावी पोहोचवणार असल्याचे श्री हनुमंत कदम यांनी सांगितले.
तालुका कार्यकारिणी पुढील प्रमाणे,
श्री अनिल महाराज मोहीते – उपाध्यक्ष
श्री मोहन महादेव शिंदे –
सचिव
श्री संतोष ठकसेन कांबळे -कार्यवाह
श्री राजेंद्र नारायण शिंदे – सदस्य
श्री प्रकाश विठ्ठल वाघमोडे-सदस्य
श्री राजेंद्र एकनाथ शिंदे -सदस्य
श्री संतोष बबन खुरंगे – सदस्य
श्री अनंता किसन ठवरे -सदस्य
श्री सूर्यकांत दादु चव्हाण
(संमोहनतज्ञ) -प्रसिद्धीप्रमुख
श्री राजाराम देवबा राउत -मार्गदर्शक
या प्रमाणे तालुका कार्यकारिणी गठीत करुन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली.
समिती अध्यक्ष श्री सतिश साकोरे यांनी लोकशाही दिना विषयी सविस्तर माहीती सांगीतली. ग्राहक कल्याण फाउंडेशन चे कार्य व कार्यकर्ता कसा असावा या विषयी ह.भ.प.तुकाराम महाराज निंबाळकर यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच राज्य कार्यकारिणी सदस्य आस्लम तांबोळी, जिल्हा अध्यक्ष नरहरी गांजवे,उपाध्यक्ष मारुती पठारे, जिल्हा सचिव सतीश थिटे व जिल्हा कार्यकारिणी सदस्य पोपटराव साठे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आभार सदस्य राजू शिंदे यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here