ग्रामीण भागातील शिक्षण सुविधा उच्च दर्जाची व्हावी यासाठी रोटरीकडून पाच शाळेमध्ये स्मार्ट टीव्ही व सॉफ्टवेअर भेट

भिगवण: रोटरी क्लब भिगवण च्या वतीने भिगवण परिसरातील सर्व शाळांमध्ये अद्यावत शिक्षण उपलब्ध व्हावे व ग्रामीण भागातील शिक्षण सुविधा उच्च दर्जाची व्हावी यासाठी रोटरी क्लब भिगवण व रोटरी क्लब ऑफ पूना फार ईस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने भिगवण परिसरातील पाच शाळेमध्ये स्मार्ट टीव्ही तसेच त्यासोबत सॉफ्टवेअर प्रधान करण्यात आले या टीव्ही संच व शैक्षणिक साहित्य चे उद्घाटन रोटरी डिस्टिक 3131 चे प्रांतपाल श्री पंकज शहा व प्रिया शहा यांच्या हस्ते मदनवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये करण्यात आले यावेळी पंकज शहा म्हणाले की ग्रामीण भागामधील रोटरी क्लब चांगले काम करत असून यापुढेही चांगले काम करेल व आम्हाला या ठिकाणी स्मार्ट टीव्ही देण्याची संधी दिलीत त्याबद्दल या शाळेचे खूप खूप धन्यवाद रोटरी क्लब अध्यक्ष श्री संजय खाडे म्हणाले या पुढील काळामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे परिसरामधील शाळांमध्ये वेगवेगळे प्रकारचे प्रोजेक्ट करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत,उपाध्यक्ष औदुंबर हुलगे संस्थापक अध्यक्ष श्री सचिन बोगावत रियाज शेख, संपत बंडगर,प्रदीप वाकसे, संजय चौधरी, कमलेश गांधी, संतोष सवाने,प्रवीण वाघ, हे उपस्थित होते यावेळी जि.प. शाळा मादनवाडी चे मुख्याध्यापक संजय बंडगर, यांनी सूत्रसंचालन केले व प्रकाश वाघ, यांनी आभार मानले शिक्षिका वर्षा बंडगर, याही उपस्थित होत्या.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here