ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी इंदापूर येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन..!!

इंदापूर/प्रतिनिधी:-सावित्रीबाई फुले जयंती व पत्रकार दिनाचे औचित्य साधत श्री शिवाजी सार्वजनिक वाचनालय भाटनिमगाव तसेच मुक्ताई ॲडव्हर्टायझिंग अँड पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांचा तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
बुधवार दिनांक ४ जानेवारी रोजी कै शंकरराव पाटील सभागृह इंदापूर पंचायत समिती येथे शालेय वकृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांमध्ये शालेय शिक्षणापासूनच त्यांच्यातल्या वक्तृत्व कला जोपासल्या जाव्यात तसेच ग्रामीण भागातील मुलांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी इंदापूर तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन श्री शिवाजी सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष पत्रकार विजय शिंदे व मुक्ताई ॲडव्हर्टायझिंग अँड पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेड प्रमुख पत्रकार जितेंद्र जाधव यांच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धा दोन गटात होणार असून विजेत्यांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
लहान गट..(५ ते ७)
विषय…
१) सावित्रीबाई फुले..
२) बालपण कालचे..
३) माझा आवडता क्रांतिकारक..
४) छत्रपती शिवाजीराजे
👉 मोठा गट (८ ते १०)
१) विविधतेने एकत्र आजचा भारत..
२) महाराष्ट्र एक संत परंपरा..
३) आजचे राजकारण…
४) फुले- शाहू-आंबेडकर विचाराची गरज..
नोंदणीसाठी संपर्क: ९८३४७५८६६३,९९६०६०४५२९
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here