भिगवण विभाग प्रतिनिधी : रोहित बागडे
भिगवण: रोटरी क्लब भिगवन आणि रोटरी क्लब ऑफ पुणे डाऊन टाऊन च्या मदतीने भिगवण पोलीस स्टेशन यांच्या अंतर्गत भिगवण व परिसरातील ग्रामसुरक्षा दलास टी-शर्ट काठी बॅटरी व शिट्टी देण्यात आले.या कार्यक्रमासाठी बारामती येथील डी वाय एस पी श्री गणेश इंगळे साहेब तसेच भिगवण येथील ए पी आय श्री दिलीप पवार साहेब पी एस आय दडस साहेब, रोटरी क्लब चे अध्यक्ष संजय खाडे, सचिव सौ सुषमा वाघ, खजिनदार प्रदीप ताटे, उपाध्यक्ष औदुंबर हुलगे, डॉ आमित खानावरे, सौ. रेखा खाडे, कुलदीप थोरात बाळासाहेब ननवरे, नामदेव कुदळे, तुषार क्ष्रीरसागर ,किरण रायसोनी संजय चौधरी, कमलेश गांधी, पप्पु भोंग तसेच ग्राम सुरक्षा दलातील भिगवण अकोले आजूबाजूचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते.
त्यामध्ये बोलताना रोटरीचे अध्यक्ष संजय खाडे म्हणाले की पोलीस स्टेशन यांनी केलेल्या आवाहनास एक मदत म्हणून रोटरी क्लब तर्फे ग्रामसुरक्षा दलातील सर्व युवकांना टी-शर्ट काठ्या व बॅटरी देण्याचे नियोजन करण्यात आले. यामधे पुणे डाऊन टाऊन क्लब च्या सदस्य व डिस्टिक सेनर्जी डायरेक्टर पल्लवी साबळे, व प्रेसिडेंट ,ऐसिस राय यांनी मोलाची मदत केली कारण पोलीस मित्र म्हणून काम करत असताना सर्व ग्राम सुरक्षा दलातील मंडळी यांना रात्रभर गस्त घालण्यासाठी या गोष्टींची आवश्यकता होती. यापुढेही रोटरी क्लब भिगवण अशा सार्वजनिक उपक्रमांना सतत सदैव मदत करण्यास तत्पर राहील. डी वाय एस पी इंगळे साहेब म्हणाले की रोटरी क्लब अत्यंत स्तुत्य व समाजोपयोगी कार्यक्रम राबवल्या बद्दल त्यांचे कौतुक केले व ग्रामसुरक्षा दल कशाप्रकारे काम करते याचे मार्गदर्शन केले. भिगवण पोलिस स्टेशनचे एपीआय पवार साहेब म्हणाले की ग्रामसुरक्षा दल मधील युवक म्हणजे पोलिसांवरील आलेला भार कमी करण्याचे काम करते व एक पोलीस मित्र म्हणून एक सामाजिक जबाबदारी पार पडत आहे अशा आपल्या मित्रांना नक्कीच ही मदत अत्यंत उपयोगी ठरणार आहे. नंतर सचिन शेठ बोगावत ,महेश शेंडगे ,डॉ अमोल खानावरे ,रियाज शेख, संपत बंडगर तसेच सौ सुषमा वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ग्राम सुरक्षा दलातील एक प्रतिनिधी म्हणून श्री सातर्ले सर यांनी आपले अनुभव व काम करणं करताना येणाऱ्या अडचणी याबद्दल माहिती दिली.
यामध्ये भिगवण रोटरी क्लब तर्फे भिगवन चे एपीआय पवार साहेब यांचा केलेल्या कामाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर अमोल खानावरे तसेच आभार संतोष सवाने यांनी मानले.