ग्रामपंचायत शेटफळ हवेली आयोजित ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम उत्साहात ..

आज मंगळवार दिनांक 13 जून 2023 रोजी ग्रामपंचायत शेटफळ हवेली यांनी शासन आपल्या दारी हा उपक्रम आयोजित केला होता.या उपक्रमांमध्ये वयोवृद्ध ,ज्येष्ठ नागरिक व विधवा महिलांसाठी शासनाच्या सर्व योजना एकाच छताखाली राबवण्यात आल्या.यामध्ये संजय गांधी निराधार योजना,श्रावण बाळ योजना, कृषीच्या सर्व योजना, आधार कार्ड दुरुस्ती, नवीन आधार कार्ड, आरोग्य शिबिर, रेशन कार्ड मधल्या दुरुस्त्या,नवीन रेशन कार्ड अशा वेगवेगळ्या योजनांचा पात्र गरजूंनी लाभ घेतला. यावेळी पुरवठा अधिकारी अंनगारे साहेब, संजय गांधी निराधार योजनेच्या सौ.शुंभागी बनसोडे,कृषी सहाय्यक जावळे साहेब,सर्कल ढहाणे भाऊसाहेब,तलाठी शिंदे भाऊसाहेब,वैद्यकीय अधिकारी खाडे मॅडम,लाईनमन जगताप, पंचायत समितीचे घरकुल योजनेचे तेजस जगताप व संबंधित ग्रामसेवक बळीराम शिंदे हे शासकीय अधिकारी उपस्थित होते.तालुक्यातील सर्वच क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दाखवून गावातील लोकांची मन जिंकली व यावेळी गावातील इयत्ता दहावी मधील प्रथम तीन विद्यार्थ्यांचा शाल,बुके व ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here