मांजरगाव ग्रामपंचायतच्या सरपंच गायत्री महेशकुमार कुलकर्णी यांचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव.

मांजरगाव (प्रतिनिधी: आम्रपाली शिंदे) ग्रामपंचायतच्या सरपंच गायत्री महेशकुमार कुलकर्णी यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा राज्य व राष्ट्रस्तरीय गुणीजन गौरव पुरस्कार मांजरगावच्या सरपंच गायत्री महेश कुमार कुलकर्णी यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. सदर कार्यक्रम माटुंगा दादर सांस्कृतिक केंद्र मुंबई येथे संपन्न झाला. त्यामध्ये मांजरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच गायत्री कुलकर्णी यांना प्रतिभा सन्मान अचिव्हर्स अवॉर्ड 2022 राष्ट्रस्तरीय भारत ज्योती आयडियल लेडी नारी सन्मान 2022 इत्यादी सन्मानाने गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प श्याम सुंदर महाराज, सुप्रसिद्ध विचारवंत लेखक पत्रकार ,कवी वक्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. रमेश आव्हाड होते. तर विशेष पाहुण्या म्हणून मा. डॉ. सौ. महालक्ष्मी वानखेडकर इंटरनॅशनल टॅलेंट आयकॉन आदी मान्यवर उपस्थित होते. सन्मानचिन्ह ,मानपत्र,मेडल,महावस्त्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here