इंदापूर:जिजाऊ दूध संकलन केंद्र आयोजित व जनता एक्सप्रेस मराठी न्यूज यांच्या संकल्पनेतून अवसरी येथे इंदापूर तालुक्यात महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून स्वतंत्र एक व्यासपीठ तयार करून देण्यासाठी गौरी महालक्ष्मी सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचा निकाल गुरुवार(दि.19 रोजी जाहीर झालेला असून विजेत्यांना रविवार (दि.22) रोजी अवसरी या ठिकाणी पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे.
जिजाऊ दूध संकलन केंद्र आयोजित व जनता एक्सप्रेस मराठी न्यूज यांच्या संकल्पनेतून गौरी महालक्ष्मी सजावट स्पर्धेतील विजेते-प्रथम क्रमांक सौ.लक्ष्मी निळकंठ भोंग (निमगाव केतकी) , द्वितीय क्रमांक सौ ऋतुजा स्वप्निल शिंदे (शेटफळ हवेली), तृतीय क्रमांक सौ. दिपाली वासुदेव माने (वडापुरी), चौथा क्रमांक सौ. वैष्णवी ऋषिकेश शिंदे (अवसरी), पाचवा क्रमांक सौ. भारती माणिक राहिगुडे (अवसरी) त्याचप्रमाणे उत्तेजनार्थ सौ. वैशाली तानाजी शिंदे (अंर्थुणे), स्वप्नाली गणेश आगरकर (बोरी), संगीता मोहन गाडे (गलांडवाडी नं.२)जिजाऊ दूध संकलन केंद्र व जनता एक्सप्रेस मराठी न्यूज यांच्या वतीने महिला वर्गाच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून कायमच वेगेवेगळे उपक्रम राबविले जातात. त्यानुसार, या वर्षी प्रथमच गौरी आरास स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेसाठी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक शांतीलाल शिंदे यांच्याकडून प्रथम पारितोषिक, येडेश्वरी उद्योग समूहाचे रणजीत निंबाळकर यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक, त्याचप्रमाणे आपली नाती आपली माणसं आपला परिवार ग्रुपच्या चंद्रकला ताई करे यांच्याकडून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात येणार आहे.व उत्तेजनार्थ क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकांसाठी डॉ. धीरज शिंगटे व अमित शिंगटे यांच्याकडून आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे भविष्यकाळात सामाजिक उपक्रम राबवण्याची परंपरा कायम राखली जाईल असे मत आयोजकांनी व्यक्त केले.
Home Uncategorized गौरी सजावट स्पर्धेस इंदापूर तालुक्यातून उस्फूर्त प्रतिसाद. निमगाव केतकी येथील लक्ष्मी भोंग...