गोरगरिबांना मदत करण्यासाठी पुढाकार घेणारे व्यक्तिमत्त्व आशिष पाटील यांची युवासेनेच्या विस्तारक पदी निवड.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने व युवासेना प्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साहेब यांनी युवासेना विस्तारक पदी आशिष पाटील यांची नियुक्ती केली आहे .आशीष पाटील यांच्याकडे डहाणू ,बोईसर ,पालघर, या क्षेत्राचा विस्तारक् पदी नियुक्ती केलेली आहे. आशिष पाटील सामाजिक ,शैक्षणिक, राजकरण, क्रीडा, सहकार क्षेत्राचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. नेहमीच गोरगरिबांना मदत करण्यासाठी पुढाकार घेणारे व्यक्तिमत्त्व ,एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख असली तरी जनसामान्यांना मधील कार्यकर्ता म्हणून सुपरिचित आहेत.त्यांच्या निवडीमुळे नक्कीच युवा सेनेला मोठा फायदा होईल असे बोलले जाते.त्यांची युवासेनेच्या विस्तारक पदी निवड झाल्यामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कौतुक होत आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here