गोरगरिबांच्या आरोग्याच्या सेवेसाठी ह भ प मच्छिंद्र महाराज लांडगे यांचे मोठे योगदान ; मंगेश चिवटे यांचे गौरवोद्गार

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांचा स्वानंद प्रतिष्ठानच्या वतीने स्वानंद भूषण पुरस्कार देवून सन्मान..!
— स्वानंद प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान व आरोग्य शिबिर संपन्न
पुणे : (प्रतिनिधी रविंद्र शिंदे)
गोरगरिबांच्या आरोग्याच्या सेवेसाठी ह भ प मच्छिंद्र महाराज लांडगे यांचे मोठे योगदान आहे. गोरगरिबांच्या समाजसेवेच्या कार्यामध्ये वाहून घेतलेल्या कीर्तनकारांमध्ये आमच्या मते महाराष्ट्रात पहिल्या दहामध्ये श्री.ह.भ.प.मच्छिंद्र महाराजांचा क्रमांक लागतो, त्यांच्या कार्याचा आदर्श इतरांनी घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले.संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनिय कामगीरी केल्याबद्दल मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांचा स्वानंद अध्यात्मिक प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.मच्छिंद्र महाराज लांडगे यांच्या हस्ते ‘स्वानंद भुषण पुरस्कार’ देवून गौरव करण्यात आला.याचवेळी श्री.ह.भ.प.नवनाथ महाराज लांडगे यांना ही संस्थेतर्फे स्वानंद भुषण पुरस्काराने श्री.मंगेश चिवटे हस्ते सन्मानित करण्यात आले.
स्वानंद अध्यात्मिक प्रतिष्ठाण च्या तिसर्‍या वर्धापन दिनानिमित्त दत्तनगर,गोसावीवस्ती हडपसर, पुणे येथे प्रतिष्ठानच्या स्वानंद क्लिनिक या हॉस्पिटलमध्ये रक्तदान व आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. स्वानंद आध्यात्मिक प्रतिष्ठानच्या वतीने मंगेश चिवटे यांचा स्वानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष ह भ प मच्छिंद्र महाराज लांडगे यांच्या हस्ते स्वानंद भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.दरम्यान मंगेश चिवटे यांच्या हस्ते संस्थेतील कार्यकर्ते, डाॅक्टर,पत्रकार, यांना सौ.रंजना पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.कोअर कमिटी अध्यक्षा सौ.सविता झोपे,डाॅ.सुजीत गायकवाड,डाॅ.सपना कोरे,सौ.सलोनी कांबळे,सौ.सुचिता हरपळे विविध क्षेत्रातील मान्यवर व परिसरातील नागरिक आदी प्रमुख उपस्थित होते.यावेळी निर्भिड पत्रकारितेचा पुरस्कार पत्रकार सुरेश मिसाळ यांना मंगेश चिवटे यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी बोलताना मंगेश चिवटे म्हणाले की, मच्छिंद्र महाराज लांडगे यांचे काम निरपेक्ष आहे. गोरगरिबांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून स्वानंद संस्थेने हॉस्पिटलची पायाभरणी केली आहे.स्वानंद क्लिनिक ची सुरुवात हि भाड्याच्या शाॅप मधुन सुरुवात झाली व आज चार मजली क्लिनीक उभे आहे.अशीच स्वप्ने पाहिला हवित.याचे जीवंत उदाहरण मी आहे असे सांगत चिवटे म्हणाले की एक सामान्य कार्यकर्ता ते वैद्यकिय कक्षाचा प्रमुख हा प्रवास गुरुवर्य एकनाथ शिंदे यांच्यामुळे झाला.एका सामान्य कार्यकर्त्याला हि संधी उपलब्ध करुन दिली.महाविकास अघाडिच्या काळात मृत अवस्थेत असनारा मुख्यमंत्री वैद्यकिय साह्यता निधी कक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरीत सुरु केला.महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातुन गोरगरीब जनतेने याचा लाभ घेतला आहे.महाराष्ट्रातील इतर किर्तनकार महाराज मंडळींनीही स्वानंद क्लिनिक चा आदर्श घ्यावा, श्री.ह.भ.प.मच्छिंद्र महाराजांनी स्वानंद अध्यात्मिक प्रतिष्ठाण उभारुण गोरगरीबांसाठी स्वानंद क्लिनिक उभारले तसे बाकींच्या महाराज मंडळींनी आरोग्याच्या सेवेच्या बाबतीत योगदान द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. समाजसेवेच्या कार्यामध्ये वाहून घेतलेल्या कीर्तनकारांमध्ये महाराष्ट्रात पहिल्या दहामध्ये श्री.ह.भ.प.मच्छिंद्र महाराजांचा क्रमांक माझ्या दृष्टिने लागतो.स्वानंद अध्यात्मिक प्रतिष्ठाण मार्फत अशीच सेवा घडत राहो,व संस्थेने अशीच प्रगती करत रहावी अशी अपेक्षा मंगेश चिवटे यांनी व्यक्त केली.संस्थेचे अध्यक्ष श्री.ह.भ.प.मच्छिंद्र महाराज लांडगे म्हणाले की, आम्ही महाराज मंडळी अध्यात्मिक ज्ञानाने संपन्न होवुन जगामध्ये धर्म प्रचार व प्रसार करत असतो.यामध्ये आम्हाला भागवत धर्म हेच सांगतो कि संत नामदेवांना कुत्र्यामध्ये देव दिसला,एकनाथांना गाढवात देव दिसला,मंग अम्हा महाराज मंडळिंना व तुम्हा अम्हाला माणसात तरी देव दिसावा,पहावा.आणी जिवंत देवाची आरोग्य क्षेत्रात सेवा व्हावी याच उद्दिष्टाने स्वानंद क्लिनिक उभारले आहे. ते पुढे म्हणाले, हे उभारताना अमेरीका,सिंगापुर,जपान,ओमन,नेपाळ या देशातुन व संपुर्ण भारतामधुन संस्थेला देणगी प्राप्त झाली.ज्या मान्यवरांनी देणगी दिली त्या सर्व मान्यवरांचे लांडगे यांनी आभार मानले. स्वानंद क्लिनिक मध्ये ३० रुपयात ओपीडी,१०० रुपयात ईसीजी,रक्त लघवी तपासनीवर ५०%सुट,तसेच औषधांवरती ३०% सुट व यातुनही एखादा गरीब आला पैसे नाहीत म्हणाला तर मोफत औषध उपचार केले जातात.पुढे लांडगे महाराज म्हणाले येणार्‍या ५ वर्षात ५०० बेडचे हाॅस्पिटल उभारणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here