गोरगरिबांची सेवा व त्यांना मदत करणे हाच आपला धर्म आहे या मिळालेल्या संधीचा फायदा समाजातील छोट्या-छोट्या व्यक्तीपर्यंत मिळाला पाहिजे हे उद्दिष्ट पुढे ठेवून यापुढील वाटचाल केली पाहिजे असे मत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज इंदापूर व बारामती तालुक्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या युवकांच्या सन्मान सोहळ्यात व्यक्त केले.
इंदापूर तालुक्यातील नव्याने PSI म्हणून निवड झालेले उमेदवार,चेतन ढावरे रा. इंदापूर शहर,निलेश दिलीप ओमासे रा.कळस,दिपाली धालपे रा. घोरपडवाडी,अशोक बाळासाहेब नरुटे रा. काजड,अनिकेत वाघ रा. अकोले,शैलेश मोरे रा. रणगाव,कु. प्रतिक्षा ग्यानदेव वणवे रा. लाकडी त्याचप्रमाणे बारामती तालुक्यातील सौ प्राजक्ता श्रीनिवास देवकाते -घुले रा पिंपळी या सर्व उत्तीर्ण झालेल्या युवकांचा सत्कार सोहळा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत आनंदाच्या वातावरणात पार पडला.यावेळी उत्तीर्ण झालेल्या युवकांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे विशेष आभारही मानले