गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने इंदापूरमध्ये आयपीएल सामने.शानदार नियोजनात रंगले हाय व्होल्टेज सामने.

इंदापूर : गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने शुक्रवार (दि. ३०) पासून इंदापूर प्रीमियर लीग आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.हे सर्व सामने यूट्यूबवरhttps://youtu.be/yjF2N-ev2ek या लिंकवर लाईव्ह दिसत आहेत.
इंदापूर प्रीमियम लिगमध्ये विजेत्या संघास प्रथम पारितोषिक 30000/- भरत शेठ शहा यांच्याकडून देण्यात येणार असून द्वितीय पारितोषिक 20000 रुपये शंकर नाना भोंग यांच्यामार्फत देण्यात येणार आहे.माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. 8-8 ओव्हरचे हे सामने होणार असून रविवारी सेमी फायनल आणि फायनल 12-12 ओव्हरचे असणार आहेत. सद्या सेमीफायनल पूर्व सामन्यांचा थरार प्रेक्षक अनुभवत आहेत.यावेळी बाळासाहेब व्यवहारे, अनिल आण्णा पवार,राजेंद्र चौगुले, हरिदास हराळे, स्वप्निल मखरे,सुभाष खरे, रमेश बनसोडे, दिलीप शिंदे,ललेंद्र शिंदे, अस्लम मुलाणी, समीर शेख, अनिल चव्हाण, समीर दुधनकर,दत्तू शिंदे, अनिल पवार, पोपट शिंदे, संजय शिंदे व खेळाडू उपस्थित होते. इंदापूर प्रशासकीय इमारतीच्या शेजारच्या शंभर फुटी रस्त्यालगतच्या क्रीडांगणावर दि.३० डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.स्पर्धेचे प्रथम पारितोषिक कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांच्या वतीने देण्यात आले आहे. इतर मान्यवरांनी वैयक्तिक बक्षिसे जाहीर केली आहेत.तालुक्यातील अनेक क्रिकेट संघांनी सहभाग नोंदवला आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.नगरपालिका मैदान शेजारील असलेल्या ग्राउंड वरती हे सामने रंगले आहेत. या सर्वसामान्यांचे नियोजन गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब व संजय (डोनाल्ड) शिंदे मित्रपरिवार यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here