लोकसेवक गणपतराव आवटे फाऊंडेशनच्या माध्यमातुन गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप..

लोकसेवक गणपतराव आवटे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप लोकसेवक गणपतराव आवटे फाऊंडेशन यांच्या वतीने करण्यात आले.जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त आवटे फाउंडेशनच्या माध्यमातून 120 गरजू विद्यार्थ्यांना अर्धा-डझन वह्या, पेन, पेन्सिल, पट्टी, खोडरबर, शॉपनर असे शालेय साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष सागर आवटे म्हणाले की,”आपली आजची येणारी पिढी ही खर्‍या अर्थाने भारताच भविष्य आहे. आज ग्रामीण भागात अर्थकारणामुळे अनेकांना आपल शिक्षण अर्ध्यात थांबवावं लागत आहे.त्यातूनच अनेक ठिकाणी शिकण्यासाठी योग्य साधनांची पूर्ती नाही झाली की ते शिक्षण थांबवावं लागत आहे. ही गोष्ट ओळखूनच हे वाटप करीत आहोत असे सागर होते यावेळी ज्या विद्यार्थ्यांना आई-वडील नाहीत तसेच जे खरंच गरजू कुटुंब व गरीब कुटुंबातील विद्यार्थी आहेत अशांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. राजा शिवछत्रपती बाल शाखा इंदापूर, धर्मवीर संभाजीराजे बाल शाखा पंधरवडी तसेच श्री हनुमान विद्यालय अवसरी या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच आवटे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर आवटे यांनी कार्यक्रमाच्या वेळी सांगितले की पहिल्या टप्प्यात 120 विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. येणाऱ्या काळात असेच दोन टप्पे पाडण्यात येतील. यावेळी संस्थापक अध्यक्ष सागर आवटे, सोमनाथ लांडगे, ॲड.आनंद केकान, विशाल करडे, गोविंद पाडूळे, बाळकृष्ण बागल, योगेश म्हेत्रे, नाना गवळी, अमित शिंगटे, राजेंद्र गारदी, विद्यालयाचे अध्यक्ष अरुण शिंगटे, मार्गदर्शिका शिगटे मॅडम, घाळके सर, लोंढे सर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here