बोरी ता.(इंदापूर) येथे शोध जिज्ञासू संशोधकांचा या कार्यक्रमा अंतर्गतचे उदघाटन तालुक्याचे गटविकास अधिकारी मा. श्री विजयकुमार परीट साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी बोलताना श्री. परीट साहेब म्हणाले, की खेडे गावामध्ये असा उपक्रम राबविण्यात येतोय हे मी पहिल्यांदाच पाहतोय, आणि उन्हाळी सुट्टी असतानाही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मोठा आहे. असे उपक्रम होणे गरजेचे आहे आणि यासाठी आर्थिक तरतूद म्हणून संबंधित ग्रामपंचायतींना १४/१५ वित्त आयोगातून आर्थिक तरतूद करण्याच्या सूचना मी स्वतः देईन. असे सांगून या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोरी गावचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.श्री गणेश बोके सर डॉ. सौ.बोके मॅडम श्री.महेंद्र चव्हाण श्री अशोक पाटील श्री चंद्रकांत लाळगे पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष श्री एकाड सर, कदम सर, चौधरी सर, पाटील सर, सोरटे सर, आगरकर सर, कुलकर्णी सर, मरळे सर, अर्जुन सर, नागरगोजे सर, अध्यक्ष सचिन देवडे सर, उपाध्यक्ष बाळासाहेब डफळ, विश्वस्त चंद्रकांत ठोंबरे सर, शिवाजी लाळगे सर, राजू जोरी सर, जगन्नाथ ठोंबरे साहेब, भारत लेंडे, मार्तंड डफळ, उपस्थित होते.कार्यक्रमाचे स्वरूप, नाविन्यता सुट्टी असूनही विद्यार्थ्यांची असलेली उपस्थिती यावर प्रभावित होऊन पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघाने खूपच कौतुक केले गावातील उपस्थित पालकांनीही भरभरून आर्थिक योगदान देऊन कौतुक केले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन श्री सचिन देवडे यांनी केले.आभार श्री चंद्रकांत ठोंबरे यांनी मानले.
Home Uncategorized “शोध जिज्ञासू संशोधकांचा” हा उपक्रम राबवून बोरीकरांचं काळाच्या पुढचं पाऊल – गटविकास...