खेळामुळे शरिरासह मनही तंदुरुस्त होण्यास मदत होते – आमदार दत्तामामा भरणे

बोरी ता.( इंदापूर) येथील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्ताने भव्य अशा राष्ट्रवादी चषक व्हॉलीबॉल स्पर्धा आदरणीय दत्तामामा भरणे यांच्या उपस्थित पार पडल्या स्व:ताहा मामांनी खेळाडूंचा वेश धारण करून मैदानात उतरून हॉलीबॉल खेळण्याचा आनंद लुटला. सर्व खेळाडूंची हस्तअंदोलन करून ओळख करून घेतली.याप्रसंगी बोलताना मामांनी बोरी गावच्या ग्रामस्थांचे उत्कृष्ट नियोजनाबद्दल विशेष कौतुक केले. याप्रसंगी आदरणीय आमदार साहेबांनी खेळाची गरज व व्यायामाची सवय याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. स्वतः खेळाडू असल्याने शालेय जीवनातील खेळाच्या आठवणी ताज्या केल्या व सर्वांनी कोणताही एक खेळ खेळत राहा त्यामुळे शरीराचा व्यायाम सुद्धा होतो व शरीर चांगले सुदृढ बनते असा आरोग्याचा कानमंत्र मामांनी दिला.याप्रसंगी इंदापूरचे नायब तहसीलदार श्री अनिल ठोंबरे विशेष पाहुणे म्हणून उपस्थितीत होते .राष्ट्रवादीचे तालुक्यातील सर्व नेते मंडळी गावातील सर्व नेते मंडळी ग्रामस्थ प्रेक्षक उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here