खासदार सुप्रिया सुळे शुक्रवारी निमगाव आणि इंदापूर दौऱ्यावर – माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे शुक्रवारी,१६ तारखेला इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असून सकाळी ११ वाजता निमगाव केतकी येथील सावता माळी मंदिरात महाराजस्व अभियाना अंतर्गत शासन आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ माननीय सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते होणार असून,यामध्ये विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले,वय,राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र, अल्पभुधारक दाखला,नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र नूतनीकरण,जातीचा दाखला, नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र आधी दाखल्यांचे वाटप तसेच शासनाशी संबंधित विविध विभागांच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे तरी निमगाव केतकी-निमसाखर जिल्हा परिषद गटातील सर्व बांधवांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.पुढे बोलताना श्री.भरणे म्हणाले की, निमगाव केतकी येथील कार्यक्रम संपल्यानंतर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिडीसी बँक विभागीय कार्यालय इंदापूर येथे ठिक २:०० वाजता,राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक बैठक सुप्रिया ताईंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार असून यामध्ये बुथ कमिटीचा सविस्तर आढावा घेतला जाणार असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here