खराब रस्ते व क्षमतेपेक्षा अधिक ऊस लोड ट्रॅक्टर यामुळे जीवघेणा ठरतोय बारामती भिगवण रस्ता.

भिगवण: भिगवण बारामती रस्त्यासाठी कोट्यावधी निधी मंजूर झाला असला तरी कामाला अजून सुरुवात नाही .रस्त्यावर खड्डे बुजवण्याचे कित्येक वेळा डागडुजी करण्याचे काम झाले पण रस्त्याच्या कामाला सुरुवात नसल्याने वाहतुकीसाठी वावरताना अपघाती वळण ,पूल नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे .मदनवाडी घाटातील वळणावर जागोजागी खड्डेमय झाल्यामुळे सध्या ऊस वाहतूक सुरू असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे .घाटात उस वाहतूक करणारे अनेक ट्रॅक्टर चालक क्षमतेपेक्षा जास्त उस लादून कसरत करत वाहतूक करत असतात.यामुळे ते स्वतःबरोबरच त्या रस्त्यावरुन येजा करणाऱ्या वाहन चालकांचा व प्रवाशांचाही जीव धोक्यात घालत असताता.
क्षमतेपेक्षा अधिक उस भरलेलेी ट्रॉली ओढणे शक्य होत नसल्याने अनेक चालक ट्रॉली तशीच रस्त्यावर उभी करुन निघून जातात. अनेकदा पाठीमागील चाकांना दगडांचे आटण लावून घाट कसाबसा चढण्याच्या करामती हे ट्रॅक्टर चालक करत असतात. जागोजागी असे दगड अनेक ठिकाणी तसेच पडलेले असतात.तसेच ऊस वाहतूक करणारे ट्रॅकटर घाटात पलटी होताना दिसत आहे यामुळे इतरांचे जीव धोक्यात असल्याचे चित्र निर्माण होत आहे .लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे असे बोलले जाते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here