आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथून घरासमोर लावलेले चार चाकी पिकअप वाहन अज्ञात चोरट्यांनी लांबपास केल्याची घटना घडली आहे. खरसुंडी येथील मदन जावीर यांच्या मालकीचे पिकअप वाहन MH10 l-AQ-7495 नेहमीप्रमाणे त्यांच्या घरासमोर लावले होते परंतु सकाळी उठल्यानंतर लक्षात आले पिकप घरासमोर नाही मदन जावीर यांनी तात्काळ आटपाडी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली असून पोलीस निरीक्षक शरद मेमाने पुढील तपास करीत आहेत. आटपाडी तालुक्यातील अनेक गावात चार चाकी ,दुचाकी ,बाजारातून मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले असून चोरट्यांचा शोध घेण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे. गर्दीच्या ठिकाणी प्रमुख रस्त्यावर सीसीटीव्ही बसवण्याची मागणी नागरिकातून होत आहे.