खडकवासला नवीन मोठा उजवा कालवा दुरुस्तीचा फायदा

खडकवासला नवीन मुठा उजवा कालव्याच्या दुरुस्तीमुळे कालव्यामध्ये आवश्यक असलेले गेज लागत आहे त्यामुळे पाणी पुर्व भागात त्वरित नेण्यास त्याचा फायदा झालेला दिसून येत आहे. झालेल्या कामामुळे पाण्याची वहन तूट कमी होऊन सदर वाचलेले पाणी वरवंड/शिरर्सुफळ तलावात काढले जात आहे त्यामुळे जानाई शिरसाई उपसा सिंचन योजना कार्यान्वित होऊन उपसा सिंचन योजनेतील लाभधारक सुद्धा समाधानी आहेत.


शेतकऱ्यांचे मत:नवीन मुठा उजवा कालव्यावरील अस्तरीकरण व इतर दुरुस्ती केल्यामुळे पाणी गळती कमी होऊन अतिरिक्त पाणी वरवंड तलावात सोडल्यामुळे तलावाच्या बाजूच्या शेतकऱ्यांना तसेच जानाई उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना फायदा होत आहे असेच पाणी उन्हाळी हंगामात उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून देण्यात यावे असे मत सागर दिवेकर यांनी व्यक्त केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here