क्रिकेट सामन्यात ६ बॉल ६ विकेट..व्वा रे लक्ष्मण..खतरनाक मराठी बॉलरची विश्वविक्रमी कामगिरी.

पनवेल:क्रिकेट खेळाचा दर्जा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हा असा खेळ आहे जो प्रत्येकाला खेळायला नक्कीच आवडतो. त्याचबरोबर या क्रिकेट खेळात कधी काय घडेल याबाबत कोणीही विचार करू शकत आहे.म्हणूनच क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटले जाते. क्रिकेटमध्ये सर्वांचे लक्ष हे नेहमीच फलंदाजांकडे असते. फलंदाजांनी केलेल्या खेळी या चाहत्यांच्या जास्त स्मरणात राहतात. कारण युवराज सिंगने काही वर्षांपूर्वी मारलेले ६ चेंडूत ६ षटकार हे सर्वांच्याच कायम लक्षात आहेत. त्यानंतर सध्या भारतात सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत ऋतुराज गायकवाडने मारलेले एका षटकातील ७ षटकार सर्वांच्यात लक्षात आहेत.क्रिकेटमध्ये ६ चेंडूवर ६ षटकार असा चमत्कार घडलाय, मात्र एखाद्या गोलंदाजाने ६ चेंडूत ६ फलंदाजांना बाद केलंय असे कधीही घडलेलं नाही. दरम्यान, गोलंदाजीतील अशक्य वाटणारा हाच कारनामा एका गोलंदाजाने करून दाखवलाय. पनवेलमध्ये एका टेनिस बॉल टुर्नामेंटमध्ये एका बॉलरने ६ चेंडूत ६ फलंदाजांना बाद करण्याची कामगिरी केली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजीत असा कारनामा घडलेला नाही. मात्र महाराष्ट्रातील एका टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गोलंदाजाने डावाच्या पाहिल्याच षटकात गोलंदाजीला येऊन विरोधी संघाचे बारा वाजवले आहेत. पनवेलच्या उसराई खूर्द येथे खेळवल्या गेलेल्या गावदेवी उसराई चषक २०२२ मध्ये लक्ष्मण नावाच्या गोलंदाजाने एकाच षटकात सहा चेंडूवर सहा गडी बाद करण्याची कमाल केली आहे.स्पर्धेतील सामना डोंडराचापाडा विरुद्ध गावदेवी पेठ संघांमध्ये सुरु होता. गावदेवी पेठ संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ४३ केल्या होत्या. प्रत्युत्तरात डोंडराचापाडा संघाच्या लक्ष्मणने एकाच षटकात विरोधी संघाच्या ६ फलंदाजांना बाद केले. याअगोदरही ऑस्ट्रेलियातील एका स्थानिक क्रिकेट स्पर्धेत आसा कारनामा घडलेला आहे. 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here