इंदापूर (प्रतिनिधी:अभिजीत खामगळ): सध्या इंदापूर तालुक्यातील कौठळीगाव व संलग्न या गावातील रस्ते चकाचक होताना दिसत आहेत. याबाबत कौठळी गावचे उपसरपंच पै. सुनील खामगळ यांनी जनता एक्सप्रेस मराठी न्यूज शी बोलताना सांगितले की, “इंदापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांच्या प्रयत्नातून कौठळी या गावासाठी सुमारे 15 कोटीचा निधी विविध विकास कामासाठी मंजूर झाला आहे. त्या विकास कामामधीलच रस्त्यांची कामे अगदी चकाचक होताना दिसून येत आहेत. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सगळ्या इंदापूर तालुक्यामध्ये विकासकामांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे.” पुढे ते म्हणाले की ,”दत्ता मामाच्या आमदार फंडातून कौठळी ते निमगाव केतकी रस्त्याचे काम एकदम चांगल्या प्रकारे चालू आहे .सदर रस्त्याच्या कामासाठी कौठळी गावातील तमाम नागरिकांची खूप दिवसापासून ची मागणी होती आणि ती मागणी दत्तामामा भरणे यांनी पूर्ण केली, त्यामुळे सर्वप्रथम मी व माझ्या कौठळी गावातील नागरिकांत तर्फे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे मनापासून आभार मानतो, तसेच मी स्वतः यामध्ये लक्ष घालून कामाची पाहणी करून संबंधित ठेकेदार व त्यांचे कर्मचारी त्यांना कामाच्या गुणवत्तेविषयी सक्त सूचना केल्या आहेत.आत्ता दत्तात्रेय भरणे यांच्या प्रयत्नातून मामांनी खरंच कौठळी गावासह संपूर्ण इंदापूर तालुक्यात विकासगंगाच आणली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत इंदापुर मध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी आणत दत्तात्रय भरणे यांनी जनसामान्यांची मने जिंकण्यात यशस्वी होत आहेत.” अशाप्रकारेे कौठळीचे उपसरपंच पैलवान खामगळ यांनी आपलेेे मत व्यक्त केले.