कोल्हापूरच्या कागल येथील श्री.छत्रपती शाहू सहकारी कारखान्यास राजवर्धन पाटील यांची सदिच्छा भेट

कोरोनाचे संकट दूर व्हावे यासाठी घेतले महालक्ष्मी मंदिरात दर्शन
इंदापूर प्रतिनिधी: निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी आज कोल्हापूर येथील श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लि., कागल कारखान्यास भेट दिली. या कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे व संचालक मंडळ यांनी साखर उद्योगाचा संबंधी चर्चा केली तसेच यावेळी राजवर्धन पाटील यांनी कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरात जाऊन करवीर निवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई) चे दर्शन घेतले व कोरोनाचे संकट दूर व्हावे अशी प्रार्थना केली.
शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये साखर उद्योगाचे स्थान महत्त्वपूर्ण असून या उद्योगाच्या वाढीसाठी अधिक नवनवीन माहिती संकलित करून शेतकऱ्यांना फायदा होण्याच्या दृष्टीने ही सदिच्छा भेट घेतल्याचे यावेळी राजवर्धन पाटील यांनी सांगितले. तसेच साखर कारखान्याच्या संदर्भात प्राप्तिकराच्या नोटीसा मागे घेण्याचे तसेच एसडीएफच्या थकीत कर्जाचे पुनर्गठन करण्याचा केंद्र सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून केंद्र सरकारचे त्यांनी आभार मानले.
राज्यावरील कोरोनाचे संकट दूर व्हावे यासाठी राजवर्धन पाटील यांनी कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरात जाऊन करवीर निवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई) चे दर्शन घेतले व प्रार्थना केली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here