इंदापूर : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता त्यावर योग्य उपाययोजना व्हावी यासाठी बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषदेच्या सर्व डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांच्या समवेत जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील -ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला तसेच योग्य उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना केल्या. कोरोनाचे संकट पुन्हा दिवसेंदिवस वाढत चालले आहे. भविष्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन येणारे संकट टाळण्यासाठी प्रलंबित असलेले लसीकरण व इतर उपाय योजना संदर्भात यावेळेस चर्चा करण्यात आली.
अंकिता पाटील -ठाकरे म्हणाल्या की,’ पुन्हा एकदा महाभयंकर असे कोरोनाचे संकट आले असून यामध्ये कोरोना बरोबरच ओमायक्रोनचे देखील संकट वाढले असल्याने याविरुद्ध उपयोजना व्हावी यासाठी आपण सर्वांनी पूर्ण कार्यक्षमतेने प्रयत्न केले पाहिजे.’