कोण होईल कर्मयोगी साखर कारखान्याचे संचालक? 21 जागांसाठी 46 अर्ज दाखल तर 6 बिनविरोध.

  1. इंदापूर || गेल्या आठवडाभरात कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक हा इंदापूर तालुक्यातील चर्चेचा विषय ठरला होता. कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेत शुक्रवार दि.24 सप्टेंबर रोजी नामनिर्देशनाच्या शेवटच्या दिवशी एकुण 21 जागंसाठी 46 उमदवारी अर्ज दाखल झाले. यापैकी सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. मात्र औपचारिकता बाकी आहे.राष्ट्रवादी कांग्रेसने आपली भुमिका स्पष्ट केल्यानंतर कर्मयोगी ची निवडणूक लागणार कि बिनविरोध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र हे चित्र 12 ऑक्टोबर रोजी स्पष्ट होणार आहे.

इंदापूर गट मधून:अनुक्रमे मदन श्रीरंग व्यवहारे माळवाडी नं.1, दिनकर पांडुरंग गायकवाड भांडगांव,शांतीलाल दत्तात्रय शिंदे अवसरी,रवींद्र वामनराव सरडे सरडेवाडी,बाळासाहेब तुकाराम मोरे माळवाडी नं.2, अमोल गुलाब इंगळे बाभुळगांव,दत्तात्रय गणपत कोळेकर सरडेवाडी,शिवाजी सतू इजगुडे शहा आणि भरत सुरेशदास शहा इंदापूर अज्ञा एकूण 9 सभासदांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहे.

 कालठण मधून:अनुक्रमे हर्षवर्धन शहाजीराव पाटील इंदापूर (दोन अर्ज), गुलाब मारुती फलफले गलांडवाडी नं.1, विष्णू दिगंबर देवकर कळाशी,राघव किसन व्यवहारे शिरसोडी,छगण धोंडिबा भोंगळे पोंदलुकवाडी,सुभाष लक्ष्मण बोंगाणे पडस्थळ,हनुमंत अंकुश जाधव कालठण नं.१, सतिश विठ्ठल जगताप कालठण नं.१ असे एकूण 9 अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

गट नंबर 3 पळसदेव:रतन हरिश्‍चंद्र देवकर लोणी देवकर ,प्रवीण यादवराव देवकर वरकुटे बुद्रुक, भूषण प्रकाश काळे पळसदेव असे एकूण तीन अर्ज दाखल झाल्याने हा गट बिनविरोध झाला आहे.

गट नं.4 भिगवण मधून:अनुक्रमे पराग रमेशराव जाधव (दोन उमेदवारी अर्ज) भिगवण , यशवंत मुकुंदराव वाघ (दोन अर्ज) तक्रारवाडी , जगन्नाथ लाला जगताप तक्रारवाडी, विश्वास रंगनाथ देवकाते मदनवाडी, निवृत्ती भिकू गायकवाड कळस, विजय विठ्ठल खर्चे कळस, सतिश उत्तमराव काळे डिकसळ, वसंत खंडू मोहळकर कळस असे एकूण 10 अर्ज दाखल झाले आहेत.

गट नं.5′ शेळगांव मधून: अनुक्रमे राहुल विठल जाधव शेळगाव, प्रतिक विश्वासराव पाटील कळंब, अंबादास विठ्ठल शिंगाडे शेळगाव ,शिवाजी दामू शिंगाडे शेळगाव, सर्जेराव गजरु शिंगाडे शेळगांव असे एकूण 5 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

अनुसूचीत जाती जमाती प्रतिनिधी: बलभीम बापू आढाव तक्रारवाडी, केशव विनायक दुर्गे अगोती नं.१ असे एकुण 2 अर्ज दाखल झाले आहेत.

इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मधून
सतीश उध्दव व्यवहारे माळवाडी नं.१ यांचा एकमेव अर्ज आहे.त्यामुळे ही जागा बिनविरोध झाली असून औपचारिक घोषणा बाकी आहे.

भटक्या विमुक्त जाती व जमाती मागास प्रवर्ग वर्गातील
हिरा शंकर पारेकर वनगळी, शिवाजी सतू इजगुडे शहा असे एकूण 2 अर्ज दाखल झाले आहेत.

महिला राखीव प्रतिनिधी
शारदा कुबेर पवार पिंपरी, कांचन अशोक कदम गोतोंडी असे एकूण 2 अर्ज दाखल झाले आहेत.त्यामुळे या जागा बिनविरोध झाल्या असून औपचारिक घोषणा बाकी आहे.

ब” वर्ग सभासद प्रतिनिधी मधून हर्षवर्धन शहाजीराव पाटील (दोन अर्ज) इंदापूर, वसंत खंडु मोहळकर कळस असे एकूण 3 अर्ज दाखल झाले आहेत.

अशाप्रकारे सर्व उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून यापैकी कोणाचा अर्ज राहतोय यावर उमेदवाराचे संचालक पदाचे भविष्य अवलंबून असणार आहे.



Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here