कॉमनवेल्थमध्ये साक्षी मलिकने कुस्तीत सुवर्णपदक मिळविल्याने “म्हारी छोरियां छोरो से कम है के” या डायलॉगची भारतीयांना आठवण. साक्षीचे सर्व भारतभर कौतुक.

कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताचे कुस्तीपटू अक्षरश: पदकांचा पाऊस पाडत आहेत.अंशूने रौैप्य तर बजरंगने गोल्ड मिळवल्यानंतर आता कुस्तीपटू साक्षी मलिकने फ्री स्टाईल 62 किलोग्राम गटात सुवर्णपदक मिळवलं आहे. तिने कॅनडाच्या अॅना गोंझालेजला मात देत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. काल बजरंग पुनिया याने 65 किलो वजनी गटात कॅनडाच्याच मॅकनील याला मात देत सुवर्णपदक मिळवलं. साक्षीचनेही सुवर्णपदक मिळाल्यामुळे आमिर खानच्या दंगल या सिनेमा मधील “म्हारी छोरियां छोरो से कम है के” या डायलॉगची आठवण आता सर्व भारतीयांना होणार हे मात्र नक्की. साक्षीने मिळवलेल्या या सुवर्णपदकामुळे भारताची पदकसंख्या 22 वर गेली आहे.हरियाणासारख्या पुरुषप्रधान संस्कृती असणाऱ्या, जिथे आजही भारतातील सर्वाधिक भ्रूणहत्या केल्या जातात, अशा राज्यात 3 सप्टेंबर 1992 रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात तिचा जन्म झाला. वयाच्या 7 व्या वर्षापर्यंत ती आपल्या आजोळी वाढली. तिचे आजोबा एक प्रसिद्ध पैलवान होते. त्यामुळे त्यांना गावात प्रचंड मानसन्मान मिळायचा.2004 साली वयाच्या 12 व्या वर्षी तिने कुस्तीचा श्रीगणेशा केला. तिने कुस्ती शिकण्याला घरातून विरोध झाला. कारण, त्या काळात मुलींनी कुस्ती खेळणे संयुक्तिक नव्हते. पण, कालांतराने हा विरोध मावळला. तिने ईश्वर दहिया यांच्याकडे कुस्तीचे डावपेच शिकण्यास सुरुवात केली. आता,बाहेरच्या लोकांनी तिच्या कुस्ती शिकण्याला आणि वस्तादांच्या शिकविण्याला विरोध सुरू केला.“कुस्ती हा फक्त पुरुषांचा खेळ आहे. मुलींनी तो खेळ खेळू नये.” यासारख्या टीकांना तिला सामोरे जावे लागले. शिवाय तिच्यासोबत कुस्ती खेळणारी एकही मुलगी नव्हती. त्यामुळे तिला मुलांच्या बरोबरच कुस्ती खेळावी लागली. अशा प्रतिकूल परिस्थितीत आता तिने सुवर्णपदक मिळवल्याने जगाच्याा नकाशामध्ये भारताचे नाव कुस्तीमध्येेे लौकिक झाले आहे. तिच्या या कामगिरीमुळेहरियाणाामध्ये आनंद उत्सव केला जात आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here