प्रतिनिधी दि.28, – पत्रकार दिनानिमित्त बारामतीमधील कै. नामदेवराव नालंदे प्रतिष्ठान व संपादक पत्रकार संघटनेतर्फे पत्रकार बांधवांचा दोन लाख रुपयांचा आरोग्य विमा मोफत करण्यात आला. यामध्ये बारामती मधील 42 पत्रकारांनी सहभाग घेऊन या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सदर कार्यक्रम आज रोजी हॉटेल ग्लोबल एक्झिक्यूटिव्ह खंडोबानगर येथे संपन्न झाला. कोरोना काळात देखील पत्रकार न थांबता कार्य करत होते, याची दखल घेत संघटनेच्या वतीने त्यांना संरक्षण मिळावे म्हणून हा कार्यक्रम आयोजित केल्याचे श्री. योगेश नालंदे यांनी सांगितले. दरम्यान या कार्यक्रमास बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव, नगरसेवक जयसिंग देशमुख, बाळासाहेब चव्हाण पाटील व टाटा Aig चे सेल्स मॅनेजर वैभव सस्ते उपस्थित होते. या कार्यक्रमास मा.भगवानराव वैराट, पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सुध्दा भेट दिली. या दरम्यान बोलताना सचिन सातव यांनी कार्यक्रमाचे कौतुक करून कोरोना काळातील कामाची दखल घेत संघटनेच्या सर्व पत्रकार बांधवांच्या कुटुंबाचा विमा खर्च मी स्वतः उचलणार असल्याचे सातव यांनी सांगितले.या वेळी संपादक पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. व जयसिंग देशमुख यांच्या वतीने संघटनेच्या 30 पत्रकार बांधवांना हिवाळी जर्किंग चे वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तानाजी पाथरकर, चेतन शिंदे, मन्सूर शेख, नानासाहेब साळवे यांनी विशेष परिश्रम घेतले.