कृषी दिनाचे औचित्य साधून कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा व उत्कृष्ट कृषी सहाय्यक अधिकारी यांचा सन्मान.

इंदापूर:कृषी दिनाचे औचित्य साधून मका पीक स्पर्धेत उच्चांकी उत्पादन घेणारे शेतकरी व कृषि क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविलेल्या महिला शेतकऱ्यांचा सन्मान तालुका कृषी अधिकारी,इंदापूर व पंचायत समिती, इंदापूर कृषी विभाग यांचे वतीने आयोजित कैलासवासी वसंतराव नाईक यांचे जयंती कृषीदिन कार्यक्रमात शेतकरी यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी तालुका कृषी अधिकारी,श्री भाऊसाहेब रुपनवर यांनी कृषी विभगामार्फत राबिण्यात येत असलेली प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमध्ये सहभागी व्हा असे आवाहन शेतकरी यांना केले. गट विकास अधिकारी,श्री.विजयकुमार परीट यांनी पिकांचा फेरपालट, माती परीक्षण करून व ठिबक सिंचन संच पद्धत वापरून जमिनीचे आरोग्य अबाधित राहील याकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले.यावेळी कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले शेतकरी बाबुराव निवृत्ती शिंदे (अवसरी), अरुण दत्तात्रय शिंदे (अवसरी) बाळासो भीमराव भाळे (वडापुरी) चंद्रकांत गणपत व्यवहारे( न्हावी) मच्छिंद्र दशरथ अभंग (बिजवडी) गोरख सिताराम काळे (बळपुरी) जगन्नाथ पांडुरंग भोंग (इंदापूर) हे शेतकरी सन्मानित झाले. तसेच श्री.भारत अभिमान बोंगाणे कृषि सहाय्यक, इंदापूर यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तालुका कृषि अधिकारी, इंदापूर यांनी त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. भारत बोंगणे हे नेहमीच शेतकऱ्यांसाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व मार्गदर्शन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पोहोचवत असतात. नेहमीच त्यांचे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पिकांबाबत मार्गदर्शनही करत असतात त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भारत बोंगाने यांच्या बद्दल विशेष आदर आहे म्हणून त्यांचा सन्मान झाल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.नावीन्यपूर्ण उपक्रम राबविलेल्या महिला शेतकऱ्यांचाही सन्मान तालुका कृषी अधिकारी व गट विकास अधिकारी यांचे हस्ते करण्यात आला.कार्यक्रमास कृषी अधिकारी,श्री.गणेश सूर्यवंशी,श्री .संजय जगताप,श्री .अजित घोगरे,श्री.सतीश महानवर विस्तार अधिकारी श्री शेख तसेच ग्रामसेवक,कृषी पर्यवेक्षक,कृषी सहयाक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गणेश सूर्यवंशी कृषी अधिकारी यांनी केले.



Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here