कुर्डूवाडी येथील ओबीसी समाज बांधवाचे डेटा संबंधी निवेदन.

काल कुर्डूवाडी मधील ओबीसी समाजातील काही युवकांनी प्रांताधिकारी ज्योती कदम मॅडम यांना एक महत्त्वपूर्ण निवेदन देण्यात आले. या निवेदनात असे म्हटले आहे की,कुर्डूवाडीमध्ये असलेल्या ओबीसी समाजाचा डाटा उपलब्ध करणे साठी महाराष्ट्र शासन परिपत्रक याप्रमाणे घरोघर जाऊन गणना करण्याचा आदेश आहे. परंतु कुर्डुवाडी नगर परिषदेमध्ये तसे न होता ऑफिसमध्ये बसूनच कामकाज केले जात आहे असे निदर्शनास आले ,अशा पद्धतीने कामकाज केल्यास समस्त ओबीसी वर अन्याय होऊन शासनास जाणारी माहिती खरी व बरोबर जाणार नाही. ओबीसी समाजाची खरी व बरोबर माहिती मिळवायची असेल तर घरोघरी जाऊन जात विचारून माहिती गोळा करावी .तसेच संबंधित डाटा तयार करण्यासाठी संबंधित कर्मचारी यांना मुदतवाढ द्यावी. त्यामुळे शासनाला खरी व बरोबर माहिती मिळेल. असे आशयाचे निवेदन आज प्रकाश अण्णा गोरे. सूर्यकांत दादा गोरे. लक्ष्मण नारायण घुगे. मोहसिन मकनु .दयानंद पवार. किशोर किर्वे. विशाल गोरे.औदुंबर सुतार. रोहित परबत. हमीद शिकलकर. अभिजीत सोलंकर .राज ढेरे. सैदोबा महाबोले. जयकुमार मारुती सुतार. यांनी प्रांत अधिकारी ज्योती कदम यांना सह्या करून निवेदन दिले.👆सुधीर गाडेकर प्रांत अधिकारी ज्योती कदम यांना निवेदन देताना
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here