कुर्डुवाडी-माढा रस्त्यावरील भोसरे, वडाचीवाडी ,वेताळवाडी या गावालगतच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे. खड्ड्यातून रस्ता शोधत जावे लागत आहे. कित्येकदा तात्पुरत्या स्वरूपाची मलमपट्टी करून देखील फारसा फरक पडला नाही उलट डागडुजी केलेल्या ठिकाणीच भल्या मोठ्या खड्ड्याचा विस्तार पाहण्यास मिळतो तसेच रस्त्याची चाळण होऊन दररोज छोट्या मोठ्या अपघात होतात तसेच कुर्डुवाडी शहरातून माढा अनगर,मोहोळ व सोलापूरच्या दिशेने जाणारी वाहतूकही भली मोठी आहे या रस्त्यावरून वैराग मानेगाव मालवंडी रिधोरेसह आसपासच्या ग्रामीण भागात ये-जा करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसही येथूनच धावत आहेत शहरी भागाबरोबरच वाडया वस्त्यावरील लोकांना न्यायालये तहसील भूमीअभिलेख नगरपंचायतीसह अन्य शासकीय निमशासकीये कार्यालयात जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे .
कार्यालयीन अधिकारी कर्मचारी विधिज्ञ मजूर शाळकरी मुला-मुलींसह अन्य लोक हे सकाळी दहाच्या सुमारास याच रस्त्यावरून आपापल्या कार्यस्थळावर मार्गस्थ होतात परंतु बेसुमार खड्ड्याचा विळखा व दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे कामकाजास विलंब होतो तसेच रेंगाळलेल्या अर्धवट कामामुळेही ऐन पावसाळ्याच्या दिवसात खड्यात पाणी साचून परिसर दुर्गंधीने व्यापला जातो व त्यातून तारेवरची कसरत करत मार्ग काढावा लागतो असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. अन्यथा १७ ऑगस्ट रोजी प्रांतकार्यालयासमोर उपोषण करू असा इशारा देण्यात आला याबाबतचे निवेदन मनसे शहरप्रमुख सागर बंदपट्टे व तसेच कॉंग्रेस शहराध्यक्ष फिरोज खान यांनी प्रांताधिकारी ज्योती कदम यांचेमार्फत बांधकाम अभियंत्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.निवेदन देता वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कुर्डुवाडी शहर अध्यक्ष सागरराजे बंदपट्टे, सरचिटणीस सोमनाथ पवार ,महेश पवार, दादा धोत्रे पिंटू विटकर, सलीम पठाण, साजिद शेख कॉंग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.