कुर्डूवाडी शहरातील रेल्वे गेट नंबर 38 बंद झाल्यापासून कुर्डवाडी गेटच्या उत्तर बाजूतील रेल्वे कॉलनी, तर दुसरा भाग दक्षिणभाग. यातील शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ ,भाजी मंडई दवाखाना, शासकीय कार्यालय, पोलीस स्टेशन, महापुरुषांचे पुतळे, धार्मिक स्थळे, एसटी स्टँड या ठिकाणी ये जा करण्यासाठी कुर्डूवाडी मधील रहिवाशांना रेल्वे पुलाखालील पाणमोरीतून ,गटारीतून रस्ता काढावा लागत आहे. यावेळी शाळेसाठी जाणारे शालेय विद्यार्थी वयोवृद्ध महिला रुग्ण यांना याच रेल्वे भरावा खालील गटारीतून जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.अनेक मोटारसायकल घसरून अपघात झालेले आहेत व भविष्यात छोटे मोठे अपघात होऊन इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी संबंधित नगरपालिका प्रशासन मुख्याधिकारी राठोड साहेब यांनी सदरच्या रोड वरती मुरूम टाकून खड्डे तात्काळ बुजवावे ,अशी मागणी येथील नागरिक रहिवासी विद्यार्थी यांनी केली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, काही नागरिक यांनी मुख्याधिकारी यांची भेट घेऊन कुर्डूवाडी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवेदन दिले . यावेळी भाजप युवा उपजिल्हाप्रमुख संतोष क्षिरसागर, सामाजिक नेते रावसाहेब मुसळे ,नितीन क्षिरसागर, चर्मकार संघटनेचे नेते उत्तरेश्वर राजगुरू ,आरपीआय नेते गणेश समदाडे, युवा नेते सोमनाथ सलगर ,अभिजित क्षिरसागर, राजाभाऊ साळवे उपस्थित होते .