कुर्डूवाडी: (प्रतिनिधी-नशीर बागवान) कुर्डूवाडी शहरातील १३० नळ धारकांची २७ लाख रुपये पाणीपट्टी गोठवण्यात आली असून याबाबत आर पी आय शहराध्यक्ष प्रशांत शेडगे यांनी दलित वस्ती त्याचप्रमाणे कोरोना काळात अनेकांचे उद्योगधंदे बंद पडले. नोकरी गेली. रोजगार गेले. अशा सर्व नागरिकांची पाणीपट्टी दहा दिवसात माफ करावी. अन्यथा नगर परिषदेवर मोर्चा काढू असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. दरम्यान कुर्डूवाडी नगर परिषदेकडून २७ लाखाची पाणीपट्टी गोठवण्यात आली आहे. शहरातील नर तपासणी मधून १३० नळ हे प्रत्यक्ष नसतानाही ते सिस्टीम मध्ये आढळून येत होते. त्यांची थकबाकी नगर परिषदेत दरवर्षी तशीच राहत असल्याने वसुलीवर परिणाम होत असल्याने सर्वे करून नियमानुसार पाणीपट्टी कमी केली आहे. प्रत्यक्षात कुठलीही पाणीपट्टी माफ केली नाही असे कर निरीक्षक स्वप्निल वाडेकर यांनी बोलताना सांगितले. प्रतिनिधी